बांगलादेशात खतनादरम्यान आणखी एका मुलाचा मृत्यू, भुलीच्या इंजेक्शनमुळे गमावला जीव

Circumcision Operation: याआधी बांगलादेशात केवळ न्हावी हे भूल न देता खतना करण्याचे काम करत होते आणि लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना फार कमी होत्या.
In Bangladesh, a boy was died during circumcision
In Bangladesh, a boy was died during circumcision
Published on
Updated on

In Bangladesh, a boy named Ahnaf Tahmin Ayham (10) was died during circumcision, he was given an anesthetic injection before the operation:

बांगलादेशात खतनादरम्यान आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. देशात अनेक दशकांपासून न्हावी भूल न देता हे काम करत होते, परंतु अलीकडच्या काळात डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करून खतना करण्याचा ट्रेंड वाढला आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाका येथे नुकतेच अहनाफ तहमीन अयहम (10) नावाच्या मुलाला खतना करण्यासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. खतनापूर्वी त्याला भूलीचे इंजेक्शन दिले जात होते, त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यांना मुलाला भूल देण्यास परवानगी दिली नव्हती. मृत बालक अहनाफचे वडील फखरुल आलम यांनी सांगितले की, त्यांनी अहनफला ढाका येथील माली बाग चौधरी पारा येथील जेएस डायग्नोस्टिक अँड मेडिकल चेक अप सेंटरमध्ये खतना करण्यासाठी नेले होते

काही वेळातच त्याचा खतना पूर्ण झाला, पण तासाभरानंतरही मुलगा शुद्धीत न आल्याने चिंता वाढू लागली. वडिलांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या शुद्धीत न आल्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अनेक वेळा विचारण्यात आले, परंतु ते सांगत राहिले की तो लवकरच शुद्धीत येईल. त्यांच्या परवानगीशिवाय भूल दिल्याचा आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वडिलांनी केली आहे. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांविरुद्ध हातीरझिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

In Bangladesh, a boy was died during circumcision
इसिसमध्ये दाखल होण्यासाठी ती घरातून पळाली! कोर्टानं दणका देत नाकारलं नागरिकत्व

मुलाच्या मृत्यूनंतर, आरोग्य मंत्री डॉ. सामंत लाल सेन म्हणाले की, भविष्यात वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये 'अशा निष्काळजीपणा'ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल.

ते म्हणाले, "मला या घटनेने खूप दु:ख झाले आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पाहिली होती. हे निराशाजनक आहे की आमचे प्रयत्न करूनही काही लोक योग्य ती खबरदारी घेण्यात अयशस्वी ठरले. अशा प्रकारची निष्काळजीपणा किंवा जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही."

In Bangladesh, a boy was died during circumcision
Odysseus Spacecraft: चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅडिंगनंतर 6 महिन्यांनी आली आनंदाची बातमी; अमेरिकन प्रायव्हेट कंपनीने रचला इतिहास

याबाबत डॉ. शाह आलम यांचे म्हणणे आहे की, योग्य तपासणी न करता चुकीच्या पद्धतीने भूल दिल्यास मुलांचा मृत्यू होण्याचा धोका असतो.

त्यांनी सांगितले की, मुलाची सुरळीत आणि सुरक्षित खतना करण्यासाठी भूल देणे आवश्यक आहे, परंतु या दरम्यान लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की, मुलाच्या शारिरीक स्थितीनुसार कोणत्या प्रकारची भूल द्यावी हे डॉक्टरांना माहिती पाहिजे.

विशेष म्हणजे बांगलादेशात खतना करताना मुलांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. सुमारे दीड महिन्यांपूर्वीही एका मुलाचा असाच मृत्यू झाला होता.

या घटनेतही अयान अहमद नावाच्या मुलाला खतनापूर्वी भूलीचे इंजेक्शन देण्यात आले होते, त्यानंतर कुटुंबीयांनीही तक्रार दाखल केली होती.

याआधी बांगलादेशात केवळ न्हावी हे भूल न देता खतना करण्याचे काम करत होते आणि लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना फार कमी होत्या. परंतु डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून खतना केल्याने अनेक बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com