Justin Trudeau & PM Modi Dainik Gomantak
ग्लोबल

Canada बाबत भारतीयांचा भ्रमनिरास, एकाच वर्षात एवढ्या टक्क्यांनी घटली विद्यार्थी संख्या; खलिस्तान मुद्याने वाढवले अंतर

Indian Students: कॅनडात गेल्या वर्षी खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा परिणाम भारताशी असलेल्या संबंधांवर दिसून येत आहे.

Manish Jadhav

Indian Students: कॅनडात गेल्या वर्षी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येसंबंधी कॅनडाच्या संसदेत भारतावर गंभीर केले. यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले. या हत्येचा परिणाम आता भारताशी असलेल्या संबंधांवर दिसून येत आहे. इतकेच नाही तर भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही 86 टक्क्यांनी घटली आहे. कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी हे मान्य केले आहे. मिलर म्हणाले की, 18 सप्टेंबर रोजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजटंचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा वाद वाढतच गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ही घसरण दिसून आली. एवढेच नाही तर या प्रकरणावर तोडगा न निघाल्याने ही परिस्थिती लवकर सुधारण्याची शक्यता नसल्याचे मिलर यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांकडून अर्ज कमी होण्याचे एक कारण म्हणजे भारत सरकारने कॅनडाच्या मुत्सद्दी कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे. मार्क मिलर म्हणाले की, भारतासोबतचे आमचे संबंध प्रभावित झाले असून त्यामुळे नवीन अर्ज मंजूर करण्याची आमची क्षमताही निम्म्यावर आली आहे. वास्तविक, भारत सरकारने सांगितले होते की, येथे कॅनडियन अधिकाऱ्यांची संख्या 62 आहे, जी खूप जास्त आहे. यानंतर त्यांनी 41 राजनयिक अधिकाऱ्यांना जाण्याचे आदेश दिले. आता फक्त 21 कॅनेडियन अधिकारी भारतात काम करत आहेत. कॅनडामध्ये भारताची अधिकारी संख्या आधीच कमी होती. अशा स्थितीत या प्रकरणात समानता असली पाहिजे, असे भारताने म्हटले आहे.

राजनयिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करताना कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी याचा परिणाम सेवांवर होईल असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, दुर्दैवाने हे हटवल्याने आमच्या कामकाजावर परिणाम होईल आणि त्यामुळे लोकांनाही समस्यांना सामोरे जावे लागेल. मार्क मिलर म्हणाले होते की, ही समस्या केव्हा सुटेल आणि भारतासोबतचे संबंध कधी सुधारण्यास सुरुवात होईल, हे अद्याप सांगता येणार नाही. ते पुढे म्हणाले की, भविष्यात भारतासोबतचे संबंध कसे असतील हे मी सांगू शकत नाही. विशेषत: पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने पुढे सरकतो यावर सर्व काही अवलंबून असेल.

दरम्यान, निज्जरच्या हत्येशी संबंधित दोन लोकांवर एजन्सी लक्ष ठेवून आहे, असे कॅनडाच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यांना कधीही अटक होऊ शकते. 2023 मध्ये फक्त 14,910 भारतीयांनी कॅनडासाठी स्टडी परमिट घेतले होते, तर त्यापूर्वी 2022 मध्ये हा आकडा 1 लाख 8 हजार 940 होता. अशा प्रकारे, स्टडी परमिटच्या संख्येत 86 टक्क्यांपर्यंत मोठी घट नोंदवली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT