Canada: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरुन भारतीयांना येतायेत धमक्या; पुन्हा वाढू शकतो भारत-कॅनडा तणाव

Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे बिघडलेले भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सुधारताना दिसत नाहीत.
Khalistani
KhalistaniDainik Gomantak
Published on
Updated on

Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे बिघडलेले भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सुधारताना दिसत नाहीत. आता ज्या प्रांतात निज्जरची हत्या झाली त्या प्रांतात राहणाऱ्या भारतीयांचा छळ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही माहिती समोर आल्यानंतर खुद्द भारत सरकारने त्याची दखल घेतली. प्रकरण कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील आहे.

गंभीर चिंता

दरम्यान, गेल्या वर्षी जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियातील सरे शहरात निज्जर याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर कॅनडाच्या सरकारने यासाठी भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. मात्र, भारताने हे आरोप फेटाळले लावले होते. या सगळ्या दरम्यान कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात भारतीय समुदायातील काही लोकांकडे खंडणीसाठी मागणी केली जात असल्याची अपडेट समोर आली आहे. भारत सरकारने ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.

चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय नागरिकांना खंडणीचे कॉल येणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. सद्य:स्थितीत यासंदर्भात नेमकी माहिती उपलब्ध नाही. ते पुढे म्हणाले की, 'आमच्याकडे कॅनडासोबत चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. आम्ही सुरक्षा परिस्थिती इत्यादींशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. ज्या मंदिरावर हल्ला झाला होता त्याबद्दल एक मुद्दा होता. यानंतर कॅनडाच्या पोलिसांनी मंदिर परिसराची तपासणी केली. घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

जयस्वाल यांनी मालदीववर भाष्य केले

मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू या महिन्यात चीनला भेट देण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता त्यांच्या पहिल्या भारत भेटीच्या परंपरेच्या विरोधात जयस्वाल म्हणाले की, 'हा निर्णय मालदिवच्या सरकारला घ्यायचा आहे. यावर कोणतीही टिप्पणी करायची नाही. ते कुठे जातात आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे पुढे चालवायचे हे त्यांनी ठरवायचे आहे.' चीनच्या जवळच्या मानल्या जाणार्‍या मुइझ्झू यांनी आपल्या देशातून भारतीय जवानांना माघे घेण्याचे आवाहन भारताला केले आहे. बांगलादेशच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर जयस्वाल म्हणाले की, ही त्या देशाची अंतर्गत बाब आहे.

भारत-कॅनडा वाद काय आहे?

दरम्यान, या संपूर्ण वादाचे मूळ हे खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण आहे. वास्तविक, निज्जर याची 18 जून 2023 रोजी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरुनानक शीख गुरुद्वाराजवळ दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि भारतात घोषित दहशतवादी होता. 18 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. भारत सरकारच्या एजंटांनी निज्जरची हत्या केली असे मानण्याचे कारण कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांना आहे, असे ट्रूडो म्हणाले होते. निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय कट असण्याची शक्यता कॅनडाच्या एजन्सी तपासत आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये कोणताही सहभाग अस्वीकार्य असल्याचे ट्रूडो यांनी म्हटले होते.

त्याचवेळी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 19 सप्टेंबर रोजी कॅनडाच्या आरोपांना पहिली प्रतिक्रिया दिली. भारताने ट्रुडोचे दावे पूर्णपणे नाकारले होते आणि ते पक्षपाती असल्याचे म्हटले होते. यासोबतच भारताने म्हटले होते की, असे आरोप खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरपंथीयांकडून लक्ष हटवण्यासाठी आहेत ज्यांना कॅनडात दीर्घकाळ आश्रय दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com