Juhi kore
Juhi kore FB/Juhi kore
ग्लोबल

Oxford मधून भारतीय विद्यार्थ्यीनीची हृदयस्पर्शी पोस्ट, आजोबांची कहाणी व्हायरल

दैनिक गोमन्तक

Juhi Kore: अशा अनेक कथा आहेत, ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि आपल्या हृदयाला स्पर्शून जातात. असाच एक किस्सा ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवीधर जुही कोरे हिने शेअर केला आहे. ही कथा तिची आणि तिच्या आजोबांची आहे, जी सोशल मीडियावर खूप शेअर केली जात आहे. या कथेत जुहीने आजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या संघर्षाचा उल्लेख केला आहे.

लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या

जुही कोरेने सामाजिक राजकारणात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे . त्यानंतर तिने लिंक्डइनवर एक नोट शेअर केली. यामध्ये तिच्या संघर्षाची लघुकथा आहे. '1947 मध्ये भारताला स्वतंत्र देश घोषित करण्यात आला होता, परंतु प्रत्येकाला त्यांचे जीवन मुक्तपणे जगण्याची परवानगी नव्हती. त्यांच्यामध्ये एक तरुण शाळकरी मुलगा होता जो महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावातील सर्वात खालच्या जातीच्या कुटुंबातील होता. शाळेत जाण्यासाठी त्याच्या घरच्यांचा विरोध होता. याची दोन मोठी कारणे होती - पहिले कारण म्हणजे त्याचे वय चार वर्षांपेक्षा जास्त होते आणि मोठा मुलगा म्हणून त्याला शेतात काम करणे आवश्यक होते. ज्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार होता. दुसरे कारण असे की, तो शाळेत गेल्यावर बाकीचे विद्यार्थी आणि शिक्षक त्याच्याशी कसे वागतील, अशी भीती त्याच्या कुटुंबीयांना होती.'

संघर्ष आणि कठोर परिश्रमाचा मार्ग निवडला

काहीही साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, असे म्हणत जुहीने पुढे लिहिले की, 'आजोबांनी दोन्ही कामे करण्याचा मार्ग निवडला. सगळे झोपलेले असतांना ते पहाटे ३ वाजता शेतात कामाला जायचे, त्यानंतर ते शाळेच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये शिकायला जायचे, पण त्याच्या आई-वडिलांची दुसरी भीती सिद्ध होईल हे त्याला फारसे माहीत नव्हते. दीड किलोमीटरचा प्रवास पुर्ण करून आजोबा शाळेत पोहचायचे. मात्र चांगले शूज नसल्याने त्याला वर्गात बसूही दिले नाही.'

जुहीने तिच्या कथेत पुढे लिहिले की, 'एवढे सगळे करूनही तिच्या आजोबांनी हार मानली नाही. शेतात काम केल्याने केवळ अन्नाचा आधार घेता येत होता, म्हणून त्यांनी स्वतःच्या जातीच्या (अनुसूचित जाती) विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके उधार घेण्यास सुरुवात केली. ही पुस्तके घेऊन ते रात्री दिव्याच्या उजेडात अभ्यास करत असे. उच्चवर्णीय विद्यार्थ्यांकडून होणारी गुंडगिरी, शिक्षकांकडून होणारा भेदभाव आणि वर्गात बसू न दिलेले असतानाही त्यांच्या जिद्दीला तडा जाऊ दिला नाही. एवढे सगळे करूनही ते केवळ परीक्षा उत्तीर्ण झाले नाही, तर त्याच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मागे टाकले.'

गुरूंनी त्यांच्या अभ्यासात मदत केली

'प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे गुरूचा हात असतो. इथे शाळेच्या मुख्याध्यापकांनी ती भूमिका बजावली. या मुलाची क्षमता आणि त्याची मेहनत ओळखून त्यांनी आजोबांची फी भरली आणि त्याना मुंबईसारख्या शहरात राहण्यास मदत केली. यानंतर जुहीचे आजोबा इंग्रजी शिकले आणि कायद्याची पदवी घेतली. यादरम्यान ते सरकारी कार्यालयात सफाई कामगार म्हणून काम करत होते. यानंतर त्यांनी या शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आणि सेवानिवृत्त झाले.'

जुही म्हणाली की, 'मला माझ्या आजोबांचा अभिमान आहे, कारण त्यांनी मला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. आज मी अभिमानाने घोषित करत आहे की मी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. पदवी मिळाल्यानंतर आजोबा इतके उत्साहित झाले की त्यांनी ही बातमी शेजारी राहणाऱ्याला, प्रत्येक भाजी विक्रेत्याला आणि दुकानदाराला सांगितली.

आज जुहीचे आजोबा तिच्यासोबत नाही, वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाले. याबद्दल बोलतांना जुही म्हणाली की, 'ते माझ्या ऑक्सफर्ड ग्रॅज्युएशन सेरेमनीला उपस्थित राहू शकले नाही, पण मला माहित आहे की ते माझ्याकडे गर्वाने पाहत असावे. अवघ्या दोन पिढ्यांमध्ये त्यांनी वास्तव बदलले. एक काळ असा होता जेव्हा त्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते आणि एक वेळ अशी आहे की त्यांची नात जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या हॉलमध्ये पदवी घेत आहे. मला त्यांचा खूप अभिमान आहे.' जुहीची ही पोस्ट सोशल मीडियावर सतत शेअर केली जात आहे आणि लोक तिच्या आजोबांच्या संघर्षाचे कौतुक करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT