America: अमेरिकेतील मेम्फिसमध्ये 19 वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 2 ठार

अमेरिकेतील टेनेसी प्रांतातील मेम्फिसमध्ये यावेळी तणावाचे वातावरण आहे.
America
AmericaDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील टेनेसी प्रांतातील मेम्फिसमध्ये एकामागून एक गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एका तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत गोळी लागल्याने दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाचा हेतू काय होता आणि तो विनाकारण लोकांना का मारत होता हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस त्याची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.

हल्लेखोराने गोळीबाराचे फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंगही केले होते,

एक 19 वर्षीय तरुण आहे ज्याने अंदाधुंद गोळीबार केला आणि खूप प्रयत्नांनंतर त्याला पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण सतत कार बदलत होता. त्यामुळेच तो पकडू शकला नाही. सुरुवातीला हल्लेखोर तरुणाने या गोळीबाराचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगही केले होते. मात्र, नंतर त्याचे सोशल मीडिया पेज ब्लॉक करण्यात आले.

पोलिसांनी हल्लेखोराचे फोटो प्रसिद्ध केले

तर यापूर्वी पोलिसांनी हल्लेखोराचे फोटो प्रसिद्ध केले होते. पोलिसांनी आरोपींना पाहताच तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले होते. यासोबतच पोलिसांनी हल्लेखोर तरुणांना पकडले जाईपर्यंत घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आरोपी अधिक लोकांना आपला बळी बनवू नयेत. सध्या पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपी कुठून आहे आणि कशासाठी तो अंदाधुंद गोळीबार करत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

America
युक्रेनवर हल्ला करुन कोणतेही नुकसान झाले नाही, फक्त फायदाच झाला: Vladimir Putin

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com