Court Dainik Gomantak
ग्लोबल

मास्क घातला नाही म्हणून भारतीय महिलेच्या छातीवर मारली लाथ, चिनी नागरिकाला नऊ महिन्यांनंतर तुरूंगवासाची शिक्षा

कोरोना काळात मास्क न घातल्याने रागवलेल्या या चिनी वंशाच्या तरूणाने महिलेवर हल्ला केला होता.

Pramod Yadav

भारतीय वंशाच्या महिलेचा वांशिक अपमान करून तिच्या छातीवर लाथ मारल्याप्रकरणी चिनी वंशाच्या एकाला तीन महिने सोमवारी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपी वोंग जिंग फॉंग (वय 32) याने चोआ चू कांग निवासी भागात भारतीय वंशाच्या महिला मॅडम हिंडोचा नीता विष्णुभाई (57) यांना लाथ मारली होती. कोविड-19 साथीच्या काळात 7 मे 2021 रोजी ही घटना घडली होती.

कोरोना काळात मास्क न घातल्याने रागवलेल्या या चिनी वंशाच्या तरूणाने महिलेवर हल्ला केला होता.

आरोपी वोंग जिंग फॉंग याने केलेल्या गुन्हाचा त्याला पश्चाताप नाही, त्यामुळे त्याच्यावर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. असे न्यायाधीशांनी सोमवारी शिक्षा सुनावताना म्हटले. नऊ दिवस चालेल्या या सुनावणीनंतर न्यायमूर्ती सैफुद्दीन यांनी वोंगला मारहाण आणि पीडितेच्या भावना दुखावल्याबद्दल दोषी ठरवले. सुनावणीदरम्यान वोंग याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले.

काय आहे प्रकरण?

7 मे 2021 रोजी कोविड-19 साथीच्या काळात महिला चोआ चू कांग मैदानात वेगाने चालत होती. महिला येथील जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. दरम्यान यावेळी तिला कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला. तिने वळून पाहिले असता तो आरोपी वोंग होता. वोंग तिला मास्क घालण्यास सांगत होता.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात मास्क घालणे बंधनकारक होते. महिला वेगाने चालत असताना तिचा मास्क उडून गेला. मात्र, आरोपीने महिलेला मास्क का घातला नाही म्हणून तिच्याशी वाद घातला आणि वादानंतर तिच्या छातीवर लाथ मारली.

सगळे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नऊ महिने या प्रकरणात दोघांच्या बाजू ऐकूण घेण्यात आल्या, त्यानंतर वोंग याला दोषी ठरवण्यात आले आहे. वोंगला तीन महिन्यांचा तुरूंगवास आणि दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA मध्ये 3 ते 4% वाढीचे संकेत, अधिकृत घोषणा कधी होणार? मोठी अपडेट समोर

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT