Indian Army shared video of Terrorist chased and killed at LoC in Poonch: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न केला. घुसखोरीचा हा प्रयत्न व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. भारतीय लष्कराने याबाबत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
अतिसंवेदनशील सीमावर्ती भागात गस्तीसाठी स्थापित केलेल्या थर्मल कॅमेऱ्यांमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे.
दोन पुरुष नियंत्रण रेषेजवळील घनदाट जंगलातून अंधाराच्या मदतीने भारतात येत असल्याचे दिसत आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे हे दोन्ही दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.
लष्कराने दोन्ही दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि त्यापैकी एक ठार झाला असून, त्याचे मुनीर हुसेन असे नाव आहे. मुनीर बागिलाद्र पूंछ येथील रहिवासी आहे. गोळीबार झालेल्या अन्य घुसखोराचे काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंभू डिव्हिजन कमांडर हुसेन, शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी 1993 मध्ये पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये गेला आणि 1996 मध्ये परत आला. तो पुन्हा 1998 मध्ये पीओकेमध्ये परत गेला, असे लष्कराने एका हिंदी वृत्त वाहिनेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सुरक्षा सैन्यावर झालेल्या अनेक हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड होता आणि मौलाना दाऊद काश्मीरच्या साथीदाराच्या जवळ होता, जो हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सय्यद सलाउद्दीनचा जवळचा सहकारी होता.
इस्लामाबादमध्ये हिजबुल मुजाहिदीन गटाची एक उच्चस्तरीय बैठक झाली ज्यात हुसेन उपस्थित होता. राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन हा या बैठकीचा अजेंडा होता. अशी माहिती आहे.
दरम्यान, पाकिस्तान दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीर भागात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, येथील तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी आणि भरती करण्याचा प्रयत्न करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.