Dubai lottery  Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीय व्यक्ती दुबईत मालामाल, जिंकली 45 कोटी रुपयांची लॉटरी, ड्रॉमध्ये पाचजण ठरले भाग्यवान

या सर्वांना साप्ताहिक सोडतमध्ये लॉटरी लागली आहे.

Pramod Yadav

Dubai: गेल्या आठवडाभरात संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) विविध शहरांमध्ये राहणाऱ्या किमान पाच भारतीयांचे नशीब उजळले आहे. या सर्वांना साप्ताहिक सोडतमध्ये लॉटरी लागली आहे. यापैकी एक व्यक्ती कंट्रोल रूमचा 'ऑपरेटर' असून, त्याने 45 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

UAE मध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक लॉटरीत पैसे गुंतवतात आणि त्यापैकी मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय लोक आहेत. बर्‍याच भारतीयांनी गेल्या काही वर्षात प्रचंड पैसा जिंकला आहे.

154 वा सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानुसार तेल आणि वायू उद्योगात कंट्रोल रूम ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या श्रीजूने 'महजूज सॅटर्डे मिलियन्स'मध्ये सुमारे 45 कोटी रुपये जिंकले आहेत.

केरळमधील रहिवासी असलेल्या 39 वर्षीय श्रीजू गेल्या 11 वर्षांपासून फुजैरामध्ये राहतात आणि तेथेच काम करत आहेत. ड्रॉ जिंकल्याची बातमी मिळाली तेव्हा तो कामावर होता.

'गल्फ न्यूज'ने श्रीजूच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, 'मी माझ्या कारमध्ये बसणार होतो तेव्हा मी माझे खाते तपासले तर मला विश्वासच बसला नाही. जेव्हा मी एवढे पैसे जिंकले तेव्हा त्याचे काय करावे हे समजत नव्हते.

माझ्या जिंकलेल्या रकमेची पुष्टी करण्यासाठी मी कॉलची वाट पाहत होतो. श्रीजू हे सहा वर्षांच्या जुळ्या मुलांचे वडील आहेत. आता तो भारतात घर घेण्याचा विचार करत आहे.

'गल्फ न्यूज'नुसार, गेल्या शनिवारी 'एमिरेट्स ड्रॉ फास्ट5'मध्ये आणखी एका भारतीयाने राफेल पुरस्कार जिंकला. दुबईत राहणारा केरळचा 36 वर्षीय सरथ शिवदासन याने सुमारे 11 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. याआधी 09 नोव्हेंबरला मुंबईतील 42 वर्षीय मनोज भावसार यांनी फास्ट 5 राफेलमध्ये सुमारे 16 लाख रुपये जिंकले होते. भावसार गेल्या 16 वर्षांपासून अबुधाबीमध्ये राहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT