Racist Cartoon 
ग्लोबल

Racist Cartoon in German Magazine: जर्मन मासिकाने भारताच्या लोकसंख्येवर बनवले 'वर्णद्वेषी' कार्टून, संतप्त यूजर्संनी चांगलेच सुनावले

German Magazine Controversial Cartoon: जर्मन नियतकालिक डेर स्पीगलने वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करुन भारतीयांवर हल्लाबोल केला आहे.

Manish Jadhav

German Magazine Controversial Cartoon: जर्मन नियतकालिक डेर स्पीगलने वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करुन भारतीयांवर हल्लाबोल केला आहे. डेर स्पीगलवर वर्णद्वेषी व्यंगचित्रे प्रकाशित केल्याचा आरोप आहे.

मासिकाचे व्यंगचित्र भारताच्या लोकसंख्येबद्दल आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकेल, असे UN च्या अहवालात म्हटले आहे, मासिकाने या विषयावर एक व्यंगचित्र प्रकाशित केले.

दरम्यान, या व्यंगचित्रात गर्दीने भरलेली भारतीय ट्रेन दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रवासी छतावर बसून समांतर मार्गावर दोन ड्रायव्हर असलेल्या आधुनिक चिनी बुलेट ट्रेनला मागे टाकत आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे.

दुसरीकडे, व्यंगचित्र व्हायरल होताच, इंटरनेट वापरकर्त्यांनी जर्मन मासिकाला आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला की, गेल्या काही दशकांमध्ये भारत खूप बदलला आहे.

एका मंत्र्याने तर मासिकाला आठवण करुन दिली की, काही दिवसांत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत जर्मनीला (Germany) मागे टाकेल, तेव्हा असे व्यंगचित्र छापण्याचा निर्णय चांगला नाही.

अशीच भावना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, व्यंगचित्राचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. त्यांनी लिहिले की, हाय जर्मनी, हे अत्यंत वर्णद्वेषी आहे.

डेर स्पीगलने भारताचे केलेले हे चित्रण वास्तवाशी साधर्म्य दाखवत नाही. भारताला अपमानित करुन चीनपुढे (China) नमते घेणे हा त्याचा उद्देश आहे.

तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या नवीन 'स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन' अहवालानुसार, या वर्षाच्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या चीनच्या 1.4257 अब्जांच्या तुलनेत 1.4286 अब्ज होईल.

तथापि, भारतातील जवळपास निम्मी लोकसंख्या (650 दशलक्ष लोक) 25 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT