Arun Subramanian Dainik Gomantak
ग्लोबल

Arun Subramanian: न्यू यॉर्कमधील अमेरिकन जिल्हा न्यायाधीशपदी अरुण सुब्रमण्यन

New York: संसदेने सुब्रमण्यम यांच्या नावाला मंजुरी दिल्यास न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश होणारे ते पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती असतील.

दैनिक गोमन्तक

Big Achievement for US Senate Arun Subramanian: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय-अमेरिकन वकील अरुण सुब्रमण्यन यांची न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्यासाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भात मंगळवारी व्हाईट हाऊसच्या वतीने संसदेला पत्र पाठवण्यात आले. संसदेने सुब्रमण्यन यांच्या नावाला मंजुरी दिल्यास न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश होणारे ते पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती असतील. सध्या ते न्यूयॉर्कमधील सुस्मन गॉडफ्रे एलएलपीमध्ये भागीदार आहेत, जिथे ते 2007 पासून काम करत आहेत.

कारकून म्हणून करिअरला सुरुवात केली

सुब्रमण्यन यांनी 2006 ते 2007 दरम्यान यूएस सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) जस्टिस रुथ बेडर गिन्सबर्ग यांच्याकडे कायदेशीर लिपिक म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी 2005 ते 2006 या काळात न्यूयॉर्कच्या (New York) दक्षिण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जेरार्ड ई. लिंच यांच्यासाठीही काम केले.

अनेक मोठे खटले फुकट लढले

सुब्रमण्यन यांनी कोलंबिया लॉ स्कूल आणि 'केस वेस्टर्न रिझर्व्ह' विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. नॅशनल एशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशन (NAPABA) ने सुब्रमण्यन यांचे नामांकन आणि यशाबद्दल अभिनंदन केले आहे. नापाबाचे कार्यवाह अध्यक्ष ए. बी. क्रूझ तृतीय म्हणाले की, 'सुब्रमण्यम हे अनुभवी वकील आहेत, ज्यांनी पैसे न घेता अनेक खटले लढवले. त्यांनी अनेक मोठे खटलेही जिंकले आहेत. यातील अनेक प्रकरणे अशी होती की, विजयाची फारशी आशा नव्हती.'

नापाबा यांनी आनंद व्यक्त केला

ए. बी. क्रूज तृतीय यांनी सुब्रमण्यम यांचे कौतुक करताना म्हटले की, "ते (Arun Subramanian) स्थलांतरितांचे पुत्र आहेत. वकील होणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांना पाहून आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही सिनेटला त्यांच्या नावाला लवकरात लवकर मान्यता देण्याची आणि न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे न्यायाधीश बनवण्याची विनंती करतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT