Barack Obama: 'अवर ग्रेट नॅशनल पार्क्स डॉक्युमेंटरी' साठी ओबामांना मिळाला एमी पुरस्कार

Our Great National Parks Documentary: पाच भागांमध्ये विभागलेल्या या माहितीपटात जगातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने दाखवण्यात आली आहेत.
Barack Obama
Barack ObamaDainik Gomantak
Published on
Updated on

Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी अवर ग्रेट नॅशनल पार्क्समधील त्यांच्या आवाजासाठी सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून 'एमी पुरस्कार' मिळाला आहे. पाच भागांमध्ये विभागलेल्या या माहितीपटात जगातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने दाखवण्यात आली आहेत.

दरम्यान, बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या हायर ग्राउंड या कंपनीने या माहितीपटाची निर्मिती केली आहे. ओबामा हे अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना एमी पुरस्कार मिळाला आहे. याआधी ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांना 1956 मध्ये विशेष एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Barack Obama
Britain New Prime Minister: ब्रिटनला आज नवे पंतप्रधान मिळणार

दुसरीकडे, ओबामा यांनी करीम अब्दुल-जब्बार ( Black Patriots: Heroes of the Civil War), डेव्हिड अ‍ॅटनबरोचा "द मॅटिंग गेम", डब्ल्यू कामाऊ बेल यांचा चार भागांचा माहितीपट "वुई नीड टू टॉक अबाउट कॉस्बी" आणि लुपिता न्योंगचा सेरेनगेटी II या स्टार श्रेणीतील माहितीपटाला मागे टाकत क्रिएटिव्ह आर्ट्स एमी समारंभात सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून पुरस्कार जिंकला. डेडलाइन मॅगझिननुसार, यापूर्वी 2016 मध्ये, डेव्हिड अ‍ॅटनबरो मीट्स प्रेसिडेंट ओबामा या टीव्ही शोसाठी बराक ओबामा यांना न्यूज आणि डॉक्युमेंटरी श्रेणीतील एमीसाठी नामांकन मिळाले होते.

मात्र, या पुरस्कार सोहळ्याला ओबामा उपस्थित नव्हते. त्यांच्या कंपनीने त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. डेडलाइन मॅगझिननुसार, फ्रीबॉर्न मीडिया आणि वाइल्ड स्पेस प्रॉडक्शननेही मालिका तयार करण्यासाठी सहकार्य केले.

Barack Obama
China Vs America: तैवान करणार अमेरिकेकडून शस्त्र खरेदी, ड्रॅगन म्हणाला...

त्याचबरोबर, 'अवर ग्रेट नॅशनल पार्क्स' हा माहितीपट एप्रिलमध्ये लाँच करण्यात आला होता. हा माहितीपट 2018 मध्ये प्रसिद्ध स्ट्रीमिंग सेवा Netflix सोबत ओबामा आणि त्यांच्या पत्नीने स्वाक्षरी केलेल्या बहु-वर्षीय फिल्म आणि टीव्ही कराराचा भाग आहे. नेटफ्लिक्सने देखील ओबामांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर, एमी विजेत्यासाठी अभिनंदन पोस्टही त्यांनी शेअर केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अभिनंदन, ज्यांनी 'अवर ग्रेट नॅशनल पार्क्स' मध्ये त्यांच्या आवाजासाठी सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून एमी पुरस्कार जिंकला.

यापूर्वी, ओबामा यांना त्यांच्या दोन पुस्तकांच्या ऑडिओ आवृत्तीसाठी ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. बराक ओबामा यांना त्यांच्या आठवणींच्या "द ऑडॅसिटी ऑफ होप" आणि "द प्रॉमिस्ड लँड" च्या ऑडिओ आवृत्त्यांसाठी ग्रॅमी मिळाले, तर 2020 मध्ये मिशेल यांना त्यांच्या स्वतःच्या ऑडिओ बुकसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला.

Barack Obama
Taiwan-China Clash: तैवान चा 'ड्रॅगन' ला इशारा

याशिवाय, त्याच समारंभात "ब्लॅक पँथर" स्टार चॅडविक बोसमन यांना मरणोत्तर क्रिएटिव्ह आर्टसाठी एमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार डिस्ने प्लस मालिकेतील 'व्हॉट इफ...? साठी देण्यात आला. हॉलिवूड प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या समारंभात बोसमन यांची पत्नी टेलर सिमोन लेडवर्ड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com