South African Country Zambia Dainik Gomantak
ग्लोबल

'या' दक्षिण आफ्रिकन देशात कॉलराचा हाहाकार, 600 जणांचा मृत्यू; भारताने पाठवली मानवतावादी मदत

South African Country Zambia: कोरोना काळात अनेक देशांना मदत पाठवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आफ्रिकन देशासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Manish Jadhav

South African Country Zambia

कोरोना काळात अनेक देशांना मदत पाठवणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आफ्रिकन देशासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या देशात एक भयंकर रोग पसरला असून त्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही इथे दक्षिण आफ्रिकन देश झांबियाबद्दल बोलत आहोत. कॉलरा हा रोग सध्या झांबियामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. यामुळे आतापर्यंत जवळपास 600 जणांचा मृत्यू झाला आहे. \

दरम्यान, भारताने झांबियाला मानवतावादी मदत पाठवली आहे. भारताने एका कमर्शियल जहाजातून सुमारे 3.5 टन मानवतावादी मदत पाठवली आहे, यामध्ये पाणी शुद्धीकरण पुरवठा, क्लोरीन गोळ्या आणि ORS पाउच इत्यादींचा समावेश आहे.

बीबीसीच्या मते, झांबियाला त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर 2023 पासून येथे कॉलरामुळे जवळपास 600 लोक मरण पावले आहेत आणि 15,000 हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.

झांबियाच्या 10 प्रांतांपैकी नऊ प्रांतांमध्ये कॉलराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तथापि, यापैकी बहुतेक प्रकरणे राजधानी लुसाका येथून नोंदवली गेली आहेत. लुसाकाची लोकसंख्या (Population) अंदाजे 3 दशलक्ष आहे. येथे अधिकाऱ्यांनी नॅशनल हीरोज स्टेडियमबाहेर तात्पुरते उपचार केंद्र उभारले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, झांबियामध्ये कॉलरामुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे 4 टक्के आहे, जे सामान्यपेक्षा खूप जास्त आहे. कॉलरातील मृत्यू दर सामान्यतः 1 टक्क्यांपेक्षा कमी असतो. युनिसेफने याचे वर्णन “एक विनाशकारी संख्या” असे केले आहे.

दुसरीकडे, उद्रेक लक्षात घेता सरकारने सामूहिक लसीकरण कार्यक्रम देखील सुरु केला आहे. अधिकारी रोगाने बाधित समुदायांना दररोज 24 लाख लिटर शुद्ध पाणी पुरवत आहेत. देशव्यापी जनजागृती मोहीमही राबवण्यात आली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीने कोरोना काळाची आठवण करुन दिली. देशातील सेवानिवृत्त डॉक्टरांना (Doctor) कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT