USA- India Dainik Gomantak
ग्लोबल

US-India Relation: चीन-पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताचा अमेरिकेबरोबर केला करार

US-India Relation: या मिसाईलच्या मदतीने हवेतदेखील वार करता येतो.

दैनिक गोमन्तक

US-India Relation: भारत आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. आता यादृष्टीने आणखी एक पाऊल उचलत भारत अमेरिकेसोबत करार करत आहे. रिपोर्टनुसार, भारत अमेरिकेडून 30 करोड अमेरिकन डॉलरचे हत्यार खरेदी करणार आहे.

या हत्यारामुळे भारत शत्रुंच्या पाणबुड्यांचा आणि युद्धनौकांचा सहजतेने सामना करु शकणार आहे. ही सगळी हत्यारे भारताच्या नौसेनेासाठी खरेदी केली जाणार आहेत. याबरोबरच भारतीय नौसेना मल्टी रोल हेलीकॉप्टर MH 60 'Romeo ची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकेकडून ३ अरब रुपयांची हत्यारे खरेदी करत आहे.

गेल्या वर्षीच MH 60 'Romeo हे सगळ्यात अॅडव्हान्स असलेले हेलिकॉप्टर भारतीय नौसेनेच्या ताफ्यात सामील केले गेले होते. या डीलनंतर एमएच-60 रोमियो हेलिकॉप्टरला हेलफायर मिसाइलसोबत जोडले जाईल.

हेलफायर मिसाइल एक शक्तीशाली अॅंटी शिपिंग हत्यार आहे. या मिसाईलच्या मदतीने टॅंक आणि कमांड पोस्टला सहज टार्गेट करता येते. याचे अनेक व्हेरियंट आहेत. हे मिसाईल इतके शक्तीशाली आहे की मोठी भिंत, बंकर आणि टॅंक यांच्यात विस्फोट करता येतो. महत्वाचे म्हणजे या मिसाईलच्या मदतीने हवेतदेखील वार करता येतो.

रिपोर्टनुसार, हे हत्यार खरेदी करण्याबाबत भारत संरक्षण मंत्रालयाची अमेरिकेबरोबर चर्चा आता शेवटच्या टप्प्यात चालू आहे. भारताने 2020मध्ये 24 MH-60 Romeo हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 16 हजार करोडची डील केली होती.

  • हेलफायर मिसाइल अमेरिकेने कधी केला होता उपयोग

हेलफायर एक प्रिसिजन-गाइडेड (precision-guided ) मिसाइल आहे. अमेरिकेने ऑगस्ट 2022मध्ये दहशतवादी गटाच्या अलकायदाच्या अल जवाहिरीला मारण्यासाठी उपयोग केला आहे.

हेलफायर मिसाइला निंजा बॉंम्ब असेदेखील म्हटले जाते. याचा व्हेरिएंट RX9 चा उपयोग अमेरिका ने सगळ्यात पहल्यांदा 2017 मध्ये सुरु केला होता. 

दरम्यान, चीन-पाकिस्तान( Pakistan ) आणि भारत यांच्यामध्ये सीमाप्रश्नावरुन सातत्याने सुरु असतात. पाकिस्तानकडून सीमेपार दहशतवादाचा भारताला नेहमीच धोका असतो. चीन हिंदीमहासागरात आपले वर्चस्व स्थापन करण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे भारत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT