Twitter New Logo: ट्विटरवरून निळी चिमणी गायब! आता एलन मस्कने हा लावला नवा लोगो

ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये बदल केला आहे.
Twitter | Elon Musk
Twitter | Elon Musk Dainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk Changes Twitter Logo with Doge Meme: ट्विटरमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यावेळी एलन मस्क यांनी ट्विटरचा लोगोच बदलला आहे. म्हणजेच आता ट्विटरवरून निळी चिमणी गायब झाली आहे. 

या बदलानंतर यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, ट्विटरने 'डॉगी' हा आपला नवा लोगो बनवला आहे.

ट्विटरचे मालक एलन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे, त्यानंतर असे मानले जात आहे की डॉगी हा ट्विटरचा नवा लोगो असेल.

सोमवारी (3 मार्च) रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या चिमणी ऐवजी कुत्रा दिसू लागला होता. हा लोगो पाहून यूजर्स आश्चर्यकारक धक्का बसला.

ट्विटरच्या लोगोवर प्रत्येकाला कुत्रा दिसतोय का, असे प्रश्न त्यांनी एकमेकांना विचारण्यास सुरुवात केली. 

काही वेळातच, #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागला. यूजर्सला वाटले की कोणीतरी ट्विटर हॅक केले आहे. पण यानंतर काही वेळातच एलन मस्कने एक ट्विट केले असून, ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे उघड माहिती दिली.

एलनने कुत्रा चालवतानाचा फोटो ट्विट केला

एलन मस्क यांनी मंगळवारी रात्री 12.20 च्या सुमारास एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये एक कुत्रा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे आणि तो त्याचा परवाना वाहतूक पोलिसांना दाखवत आहे. 

या परवान्यावर निळ्या चिमणीचा फोटो आहे (जुना ट्विटर लोगो). त्यानंतर डॉगी ट्रॅफिक पोलिसांना सांगत आहे, "हा जुना फोटो आहे". मस्कच्या या ट्विटनंतर ट्विटरवर केल्या जात असलेल्या विविध अटकळांना पूर्णविराम मिळाला आणि एलन मस्कने लोगो बदलल्याचे उघड माहिती दिली.

Twitter | Elon Musk
NASA Artemis II: 50 वर्षानंतर पुन्हा मिशन 'चंद्र', चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी नासाकडून चार जणांची निवड

मस्कने याआधीही 'डॉगी'बद्दल संकेत दिले होते

एलन मस्कने यापूर्वीही डॉगीबद्दल संकेत दिले होते. त्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक फोटो ट्विट केला होता. मस्कने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "ट्विटरचे नवीन सीईओ अप्रतिम आहेत." 

फोटोमध्ये ट्विटरच्या सीईओच्या खुर्चीवर एक कुत्रा बसला होता. त्याच्या समोरच्या टेबलावर एक कागद ठेवला होता, ज्यामध्ये या कुत्र्याचे नाव फ्लोकी आणि खाली मुख्य कार्यकारी अधिकारी असे लिहिले होते. या कागदावर ट्विटरचा लोगो म्हणजेच ब्लू बर्ड होता.

मात्र, तेव्हा कोणीही विचार केला नव्हता की मस्क ट्विटरचा अनेक वर्षांचा लोगो बदलणार आहे. 

एलनने दिलेले वचन पूर्ण केले?

ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर एलन मस्क यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले होते, ‘जसे वचन दिले’. वास्तविक, या ट्विटमध्ये मस्कने 26 मार्चच्या जुन्या चॅटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. 

या स्क्रीन शॉटमध्ये केलेल्या पोस्टमध्ये मस्कने विचारले आहे की, "नव्या प्लॅटफॉर्मची गरज आहे का?" यावर चेअरमन नावाच्या युजरने कमेंट करत ट्विटर विकत घ्या आणि त्याचा ब्लू बर्ड लोगो बदलून डॉगी असे लिहिले. 

  • एलन मस्कने ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले

ट्विटर जुलै 2006 मध्ये सुरू झाले. त्याची स्थापना जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स आणि बिझ स्टोन यांनी केली होती. एलन मस्कने गेल्या वर्षी ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साइट विकत घेतली होती.

यासाठी त्यांनी 44 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यांनी प्रति शेअर $54.2 या दराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म $44 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती.

पण नंतर स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे त्यांनी तो करार रोखून धरला. जरी मस्क या करारातून माघार घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यांनी वेळेत करार पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com