India Set UP Control Room Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांसाठी MEA ने स्थापन केला नियंत्रण कक्ष

यातच आता इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने बुधवारी एक अॅडवायजरी जारी केली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. हमासचे दहशतवादी जगातील सर्वात अभेद्य समजल्या जाणाऱ्या इस्रायलच्या सीमेत घुसले. त्यांनी शेकडो लोकांना ओलीस ठेवले आणि हजारो लोकांची हत्या केली.

यातच आता, इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने बुधवारी एक अॅडवायजरी जारी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी युद्धग्रस्त देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तेल अवीव येथील दूतावासात स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर एका व्हिडिओ संदेशात, इस्रायलमधील (Israel) भारतीय राजदूत संजीव सिंगला यांनी नागरिकांना स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शिवाय काही समस्या उद्भवल्यास दूतावासाच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

नियंत्रण कक्ष

दुसरीकडे, भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इस्रायल-हमास युद्धादरम्यान लोकांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

इस्रायलमधील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि तिथे अडकलेल्या लोकांची माहिती आणि मदत करणे हा नियंत्रण कक्ष स्थापनेमागचा उद्देश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या या नियंत्रण कक्षात 24 तास काम सुरु राहणार आहे.

दरम्यान, दूतावासात नोंदणी केल्यास आपत्कालीन परिस्थितीत किंवा काही गरज भासल्यास तात्काळ संपर्क साधता येईल. त्याचबरोबर आम्ही ईमेल नेटवर्कद्वारे विविध कार्यक्रमांबद्दल माहिती उपलब्ध करुन देत आहोत," असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अॅडवायजरीमध्ये म्हटले आहे.

दूतावास 24 तास सुरु असलेल्या हेल्पलाइनद्वारे इस्रायलमधील भारतीय नागरिकांना (Citizens) मदत करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. कृपया शांत आणि सतर्क राहा आणि सुरक्षा सल्ल्यांचे पालन करा," असेही त्यात पुढे म्हटले आहे.

संपर्क साधण्यासाठी

1800118797 (टोल-फ्री)

+91-11 23012113

+91-11-23014104

+91-11-23017905

+919968291988

situationroom@mea.gov.in.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT