Israel Hamas War: पाळीव प्राण्यांनाही सोडले नाही, हमासच्या दहशतवाद्यांनी कुत्र्याला गोळ्या झाडून मारले

एका घराचे रक्षण करणार्‍या कुत्र्याने हमासच्या लोकांचा पाठलाग करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दहशतवाद्यांनी त्याला निर्दयपणे गोळ्या घातल्या.
Viral Video of Hamas terrorists fired shots at the dogs guarding the house in Israel
Viral Video of Hamas terrorists fired shots at the dogs guarding the house in IsraelDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video of Hamas terrorists fired shots at the dogs guarding the house in Israel:

इस्लामिक दहशतवादी संघटना हमास इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान माणसांबरोबरच प्राण्यांनाही आपल्या हिंसेचा बळी बनवत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून घराचे रक्षण करणाऱ्या कुत्र्यावर गोळ्या झाडल्या.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ दहशतवाद्यांच्या गणवेशावर बसवण्यात आलेल्या बॉडीकॅममध्ये रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ हमासने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करण्यासाठी प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आता या कृत्यामुळे हमासवर टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हल्ला करण्यासाठी घुसलेले हमासचे दहशतवादी किब्बुत्झच्या भागात पोहोचले होते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा परिसर पूर्णपणे निर्जन आहे आणि तिथे फक्त एक कुत्रा पहारा देत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कुत्रा हमासच्या दहशतवाद्याला पाहताच त्याच्याकडे हल्ला करण्यासाठी धावतो. कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी घाबरलेला दहशतवादी त्याच्या असॉल्ट रायफलने त्याच्यावर गोळी झाडतो. कुत्रा जखमी होऊनही त्याच्यामागे धावतो, पण हमासचा दहशतवादी त्याला आणखी गोळ्या झाडून ठार करतो.

कुत्र्याला मारल्यानंतर दहशतवादी निर्जन घरात घुसतात आणि फ्रीज उघडतात. यानंतर त्यांनी घराला आग लावली. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 900 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3000 लोक जखमी झाले आहेत.

इस्त्रायली स्वयंसेवी संस्थांनी फक्त एका भागात 108 मृतदेह सापडले आहेत जिथे दहशतवाद्यांनी ही घटना घडवली. या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना किबुत्झ बेरी येथे घडली.

हमासच्या दहशतवाद्यांनी पहिल्यांदा इस्रायलमधील किबुत्झमध्ये एका संगीत महोत्सवावर हल्ला केला होता. ज्यामध्ये 260 लोक मारले गेले आणि मोठ्या संख्येने लोकांना ओलीस ठेवण्यात आले.

हमासच्या दहशतवाद्यांनी याच संगीत महोत्सवातून शानी लौक या जर्मन महिलेचे अपहरण करून तिची निर्वस्त्र शरीरासह गाझामध्ये परेड काढली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com