Swiss Bank Account | AEOI  Dainik Gomantak
ग्लोबल

Swiss Bank Account: स्विस बँक खात्यांविषयीचा पाचवा सेट भारताला मिळाला; नाव, पत्ता, खात्यातील पैशांचीही माहिती...

Akshay Nirmale

Swiss Bank Account of Indians: स्विस बँक खात्याच्या तपशीलांचा पाचवा संच भारताला मिळाला आहे. वार्षिक ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन (AEOI) अंतर्गत स्वित्झर्लंडने जगभरातील 104 देशांसोबत सुमारे 36 लाख आर्थिक खात्यांचे तपशील शेअर केले आहेत.

भारताला AEOI अंतर्गत स्वित्झर्लंडकडून प्रथम तपशील सप्टेंबर 2019 मध्ये प्राप्त झाला होता. तेव्हा त्यांनी 75 देशांशी माहिती सामायिक केली होती.

भारतासोबत शेअर केलेले तपशील अनेक खात्यांसह शेकडो आर्थिक खात्यांशी संबंधित आहेत. या डेटाचा वापर करचोरी, मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग यांसारख्या गैरकृत्यांचा तपास करण्यासाठी केला जाईल.

ही देवाणघेवाण गेल्या महिन्यात झाली आणि पुढील माहितीचा संच स्वित्झर्लंडकडून सप्टेंबर 2024 मध्ये सामायिक केला जाईल, अशी माहिती आहे.

नाव-पत्त्यापासून खात्यातील शिल्लक माहितीपर्यंत डेटा संरक्षण आणि गोपनीयतेसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर फ्रेमवर्कच्या पुनरावलोकनासह, दीर्घ प्रक्रियेनंतर स्वित्झर्लंडने भारतासोबत AEOI ला सहमती दर्शवली होती.

देवाणघेवाण केलेल्या तपशीलांमध्ये नाव, पत्ता, देश आणि टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर तसेच खात्यातील शिल्लक आणि भांडवली उत्पन्नाशी संबंधित माहितीही समाविष्ट आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारताला मिळालेला AEOI डेटा बेहिशेबी संपत्ती असलेल्यांविरुद्ध खटला उभारण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. डेटामध्ये ठेवी आणि हस्तांतरण तसेच सर्व कमाई, इतर मालमत्तांची संपूर्ण माहिती असते.

फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन (FTA) ने सांगितले की, या वर्षी माहितीच्या देवाणघेवाणीच्या यादीत पाच नवीन देशांचा समावेश केला आहे. यामध्ये अल्बानिया, ब्रुनेई दारुसलाम, नायजेरिया, पेरू आणि तुर्की यांचा समावेश आहे. दरम्यान, आर्थिक खात्यांची संख्या सुमारे एक लाखाने वाढली आहे.

स्विस खाते म्हणजे काय?

स्वित्झर्लंडमधील सर्व बँकांना स्विस फेडरल बँकिंग कायद्याच्या गोपनीयता कायद्याच्या कलम 47 अंतर्गत बँक खाती उघडण्याचा अधिकार आहे. स्वित्झर्लंडमध्ये जर कोणी गुन्हा केला नसेल तर बँक त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देत ​​नाही.

तथापि, 2017 मध्ये जागतिक समुदायाच्या दबावानंतर कायदा शिथिल करण्यात आला आणि माहितीची देवाणघेवाण सुरू झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT