India Plans To Rename 30 Location Of Tibet Dainik Gomantak
ग्लोबल

भारत बदलणार तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे; चीनला त्याच्याच भाषेत मोदी सरकारचे उत्तर!

India Plans To Rename 30 Location Of Tibet: अरुणाचल प्रदेशातील चीनच्या कारवायांना मोदी सरकार त्याच्याच भाषेत उत्तर देणार असल्याची बातमी आहे.

Manish Jadhav

India Plans To Rename 30 Location Of Tibet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील चीनच्या कारवायांना मोदी सरकार त्याच्याच भाषेत उत्तर देणार असल्याची बातमी आहे. भारताने तिबेटमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारीच पदभार स्वीकारला. चीनसोबत सुरु असलेला सीमावाद सोडवण्यावर भर देणार असल्याचे यावेळी जयशंकर म्हणाले.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, भारत सरकारने तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलण्यास मान्यता दिली आहे. ऐतिहासिक शोध आणि तिबेट क्षेत्राच्या आधारावर ही नावे देण्यात येतील. असे वृत्त आहे की, भारतीय लष्कर ही नावे जाहीर करेल. त्यानंतर लगेच ही नावे वास्तविक नियंत्रण रेषेच्या म्हणजेच LAC च्या नकाशावर अद्यायावत केली जातील.

विशेष म्हणजे, चीनने एप्रिल महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील 30 ठिकाणांची नावे बदलली. याच पाश्वभूमीवर आता मोदी सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे. त्यावेळी, चीनच्या निर्णयाचा भारताकडूनही तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता. अहवालानुसार, भारत बदलणार असलेल्या नावांच्या या यादीत 11 निवासी क्षेत्रे, 12 पर्वत, 4 नद्या, 1 तलाव, 1 पर्वतीय खिंड आणि 1 जमिनीचा तुकडा असा समावेश आहे. चीनकडून वारंवार दावे करुनही भारत अरुणाचल प्रदेश हा देशाचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करत आला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?

जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की, भारत चीनच्या सीमेवरील उर्वरित समस्या सोडवण्यावर भर देणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या सीमावादामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही वेळातच जयशंकर यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेपलीकडील दहशतवादाचा उल्लेख केला आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

जयशंकर पुढे म्हणाले की, 'इंडिया फर्स्ट' आणि 'वसुधैव कुटुंबकम' ही भारतीय परराष्ट्र धोरणाची दोन मार्गदर्शक तत्त्वे असतील. चीनसोबतच्या संबंधांबाबत जयशंकर म्हणाले की, काही समस्या त्या देशाच्या सीमेवर आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. उरलेले प्रश्न कसे सोडवायचे यावर आमचे लक्ष असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: ठरलं! भारतात येतोय फुटबॉलचा बादशहा 'मेस्सी'; केरळमध्ये खेळणार सामना

Goa Politics: कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा? मुख्यमंत्र्यांचा नेमका कौल काय? गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

Mumbai Goa Highway Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, मालवणला जाणारी बस जळून खाक; चाकरमानी थोडक्यात बचावले

SCROLL FOR NEXT