Jane Marriott Dainik Gomantak
ग्लोबल

PoK ला भेट देणाऱ्या कोण आहेत ब्रिटीश राजदूत जेन मॅरियट? भारताने व्यक्त केली नाराजी

India Over British Diplomat Visit to PoK Said Unacceptable: ब्रिटनच्या राजदूताने पीओकेला भेट दिल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Manish Jadhav

India Over British Diplomat Visit to PoK Said Unacceptable: ब्रिटनच्या राजदूताने पीओकेला भेट दिल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनच्या राजदूत जेन मॅरियट यांनी पीओकेमधील मीरपूरला भेट दिल्यानंतर भारताने नाराजी व्यक्त केली. भारताने हे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, मॅरियट आणि ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या आक्षेपार्ह भेटीची भारतीय बाजूने गंभीर दखल घेतली आहे. भारताने आपल्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांच्याकडे याचा तीव्र निषेध नोंदवला.

प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन - भारत

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, 10 जानेवारी 2024 रोजी ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यासह इस्लामाबादमधील ब्रिटीश राजदूताच्या पाकव्याप्त काश्मीरला झालेल्या अत्यंत आक्षेपार्ह भेटीची भारताने गंभीर दखल घेतली आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे असे उल्लंघन अस्वीकार्य आहे. या उल्लंघनाबद्दल परराष्ट्र सचिवांनी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांकडे तीव्र शब्दात निषेध नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच राहतील.

कोण आहेत जेन मॅरियट?

पाकिस्तानातील ब्रिटनचे राजदूत 10 जानेवारीला पीओकेला गेले होते. ब्रिटिश राजदूताचे नाव जेन मॅरियट आहे. जेन मॅरियट या पाकिस्तानमधील ब्रिटनच्या उच्चायुक्त आहेत. त्या केनियातील माजी एचसी, येमेनच्या राजदूतही राहिल्या आहेत. याआधी त्यांनी इराक, अफगाणिस्तान, अमेरिका आणि इराणमध्येही काम केले आहे.

राजनाथ सिंह ब्रिटन दौऱ्यावर आहेत

मॅरियट या काळात अनेक सरकारी अधिकाऱ्यांनाही भेटल्या. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही केली होती. भारताचे संरक्षण मंत्री ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना हा प्रकर घडला आहे. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आहे. ब्रिटीश राजनयिकाच्या भेटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT