Pakistan: कंगाल पाकिस्तानला इस्लामिक स्टेटकडून मोठा धोका; धार्मिक संघर्ष भडकवण्यासाठी...

Pakistan News: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे.
ISIS News
ISIS NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan News: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा देशात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, ''खैबर पख्तुनख्वाच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये तेहरीक-ए-तालिबान आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय इस्लामिक स्टेट (ISIS) कडूनही मोठा धोका आहे.'' ISIS देशात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाचे हे वक्तव्य अशा वेळी आले जेव्हा सिनेटला अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर टीटीपीचा वाढता प्रभाव आणि बंदी घातलेल्या गटाच्या विरोधात तालिबानच्या नेतृत्वाखालील अंतरिम अफगाण सरकारच्या निष्क्रियतेबद्दल माहिती देण्यात आली.

दरम्यान, संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलेल्या लेखी उत्तरात गृह मंत्रालयाने सांगितले की, “इसिसच्या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शक्ती आणि क्षमता वाढवण्यासाठी इतर दहशतवादी गटांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी मुख्यतः खैबर पख्तूनख्वावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः विलीन झालेल्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रसार वाढत आहे. ते बलुचिस्तानमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा तसेच नेटवर्क सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे."

ISIS News
Pakistan News: भीषण! न्यायाधीशाच्या पत्नीने पार केली क्रूरतेची सीमा, 14 वर्षांची मुलगी मृत्यूच्या दारात...

मंत्रालयाने पुढे म्हटले की, ''स्वयंघोषित इस्लामिक स्टेट दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे आणि धार्मिक संघर्ष भडकवण्यासाठी शिया आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध दहशतवादी कारवायांचा अवलंब करत आहे.'' सीमेपलीकडून होणाऱ्या बेकायदेशीर हालचाली रोखण्यासाठी राज्य यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कुंपण घालण्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे, असेही ते म्हणाले.

ISIS News
Pakistan vs New Zealand: पाकिस्तानच्या 'या' धाकडचा करिष्मा, न्यूझीलंडविरुद्ध केला विश्वविक्रम

दुसरीकडे, गेल्या वर्षी अफगाणिस्तान-आधारित दहशतवादी गटांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यांचा सामना केल्यानंतर पाकिस्तानने मार्च 2017 मध्ये अफगाणिस्तानसोबतच्या खुल्या सीमेवर कुंपण घालण्यास सुरुवात केली. 2,640 किमी लांबीच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये पाकिस्तान सरकारसोबतचा युद्धविराम रद्द झाल्यानंतर दहशतवाद्यांनी हल्ले आणखी तीव्र केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com