Vladimir Putin NSA Ajit Doval Dainik Gomantak
ग्लोबल

India On Russia-Ukraine War: अजित डोवाल म्हणतात, युक्रेनमध्ये शांतता गरजेची पण रशिया...

India On Russia-Ukraine War: अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली युक्रेनसाठी शांतता फॉर्मुला तयार केला आहे.

दैनिक गोमन्तक

India On Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनचे युद्ध गेल्या दीड वर्षापासून सुरु आहे. या युद्धात दोन्ही देशांसोबतच संपूर्ण जगाचेही नुकसान झाले आहे. जगभरातून हे युद्ध थांबावे यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसतात.

नुकतीच सौदी अरेबियातील जेद्दामध्ये जवळजवळ 40 देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची मीटींग पार पडली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील सहभागी झाले होते. मिळालेल्या माहीतीनुसार, या मीटिंगमध्ये अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली युक्रेनसाठी शांतता फॉर्मुला तयार केला आहे.

युक्रेनमध्ये शांतता गरजेची आहे मात्र रशियालादेखील यामध्ये सहभागी करणे गरजेचे असल्याची भूमिका भारताने सर्व जगासमोर स्पष्ट केली आहे. डोवाल म्हणतात- युक्रेनसाठी कोणताही प्रस्ताव बनेल त्यामध्ये रशिया असणे गरजेचे आहे.

आत्तापर्यंत अनेक शांती फॉर्मुले समोर ठेवले, या सगळ्यात काही ना काही सकारात्मक गोष्टी होत्या. मात्र या दोन्ही देशांनी या फॉर्मुल्यांचा स्विकार केला नाही.

युक्रेनने 10 पॉइंट सादर केले असले तरीही रशिया सध्या इथे नसल्याने त्यामुळे रशिया याला मान्यता देईल की नाही सांगता येणार नाही. त्यामुळे रशियाचे मत विचारात घेणे महत्वाचे असल्याची भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. दरम्यान, किती देशांनी या शांतता फॉर्मुलाला समर्थन दिले याची माहीती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

SCROLL FOR NEXT