Suspected Rocket Attack On Afghan Presidential Palace Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: राष्ट्रपती भवनावर रॉकेट हल्ला

ईद-अल-अधाच्या मुस्लिम सुट्टीच्या दिवशी राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या भाषणापूर्वी अफगाणच्या(Afghanistan) राजधानीत मंगळवारी कमीतकमी तीन रॉकेट्स दाखल झाल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे

दैनिक गोमन्तक

ईदची(Eid al-Adha) नमाज चालू असतानाच अफगाणिस्तानच्या(Afghanistan) काबुल(Kabul) शहरावर बॉम्ब हल्ला झाला आहे.एएनआयच्या वृत्तानुसार राष्ट्रपती भवनाजवळील भागात तीन रॉकेट गोळीबार करण्यात आले असून हे रॉकेट्स पारवान-ए-से भागातून टाकण्यात आले आणि काबुलच्या बाघ-ए-अली मर्दन आणि चमन-ए-होजोरी भागात 1 आणि काबुलच्या मनाबे बशरी भागावर 2 अस्से हे रॉकेट् हल्ले करण्यात आले आहेत.

ईद-अल-अधाच्या मुस्लिम सुट्टीच्या दिवशी राष्ट्रपती अशरफ गनी(Ashraf Ghani) यांच्या भाषणापूर्वी अफगाणच्या राजधानीत मंगळवारी कमीतकमी तीन रॉकेट्स दाखल झाल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. सकाळी नमाजाच्या वेळी 8 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच

आज अफगाणिस्तानच्या शत्रूंनी काबूल शहराच्या वेगवेगळ्या भागात रॉकेट हल्ले केले, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मीरवाईस स्टॅनिकझई यांनीही हे स्पष्ट केले आहे.

दरम्यान या हल्ल्यांनंतर "सर्व रॉकेट तीन वेगवेगळ्या भागांवर आदळले असून आमच्या सुरुवातीच्या माहितीच्या आधारे आमची कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आमची टीम तपास करत आहे." अशी माहितीही गृहमंत्रालयाने दिली आहे.

हल्ल्यानंतर काही मिनिटांनंतर गनी यांनी आपल्या काही उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशाला संबोधित केल. डिसेंबर मध्येही असाच एक रॉकेट हल्ला अफगाणिस्तानवर झाला होता.

दरम्यान कालच अफगाणमध्ये वाढत असलेल्या तालिबानी हमल्यावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले असून सरकारचे उद्दीष्ट म्हणजे अफगाणिस्तानात राजकीय करार करणे, जेणेकरून देशात शांतता प्रदीर्घकाळ टिकू शकेल.अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली आहे.तसेच राष्ट्रपतींनी भारताचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, हा असा देश आहे ज्यात आपल्याकडे व्यापाराचे सकारात्मक संतुलन आहे. भारत सलमा धरण आणि संसद भवन बांधत आहे. ते म्हणाले की शहूट डॅम व ट्रान्समिशन लाईनचे कामही सुरू आहे. भारत तेजीत आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नेतृत्वात भारत मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे यात आम्हाला सहभागी व्हायचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT