अफगाणिस्तानात(Afghanistan) तालिबानच्या(Taliban) वाढत्या वर्चस्वादरम्यानच आता अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी आपल्या देशाच्या विकासात भारताला(India) खरा भागीदार आणि मित्र म्हणून वर्णन केले आहे.विशेष म्हणजे नुकतेच तालिबान संबंधांबद्दल अशरफ गनी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडेबोल सुनावले होते. (President of Afghanistan)
याचवेळी बोलताना राष्ट्रपती गनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांबद्दलही भाष्य केले आहे . ते म्हणाले की अफगाण सुरक्षा दलांनी तालिबान्यांना पुढे जाण्यापासून रोखले आहे. भारतीय पत्रकार डॅनिश सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल त्यांनीही शोकही व्यक्त केला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्ष गनी म्हणाले की अफगाण सुरक्षा दलांनी तालिबानी अतिरेक्यांना शहरात जाण्यापासून रोखले आहे. तालिबान्यांनी अलीकडच्या काळात अफगाणिस्तानातील अनेक महत्त्वाच्या अड्डे ताब्यात घेतल्याचेही त्यांनी कबूल केले. ते म्हणाले की ते पाकिस्तान आणि तालिबान या दोन्ही देशांसोबत चर्चेची दारे खुली असून आम्ही चर्चा करायला तयार आहोत.
तालिबानचे वाढते हल्ले रोखण्यासाठी भारताला कोणतीही लष्करी मदत मागितली नसल्याचे यावेळी गनी यांनी सांगितले आहे . ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या विकासामध्ये भारत खरा भागीदार आणि मित्र आहे. आमचे ध्येय देशातील तालिबान्यांना पराभूत करणे हे आहे यावर त्यांनी भर दिला आहे.अफगाणिस्तानात आंतरराष्ट्रीय युती किंवा सैन्याच्या वापराची वेळ संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर याक्षणी भारताकडून आपणास काय अपेक्षा आहे? अफगाणिस्तानने कोणत्याही प्रकारच्या लष्करी मदतीची मागणी केली आहे? यावर अध्यक्ष गनी म्हणाले की आता अशी कुठलीच मागणी नसून अफगाणिस्तानाच्या विकासासाठी भारताने उल्लेखनीय योगदान दिले आहे. ते म्हणाले की, मोदींशी आमचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध आहेत.ते खूप हुशार आहेत. भारत हा आपला खरा मित्र असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपतींनी भारताचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, हा असा देश आहे ज्यात आपल्याकडे व्यापाराचे सकारात्मक संतुलन आहे. भारत सलमा धरण आणि संसद भवन बांधत आहे. ते म्हणाले की शहूट डॅम व ट्रान्समिशन लाईनचे कामही सुरू आहे. भारत तेजीत आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नेतृत्वात भारत मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे यात आम्हाला सहभागी व्हायचं आहे.
तर दुसरीकडे अफगाणमध्ये वाढत असलेल्या तालिबानी हमल्यावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले असून सरकारचे उद्दीष्ट म्हणजे अफगाणिस्तानात राजकीय करार करणे, जेणेकरून देशात शांतता प्रदीर्घकाळ टिकू शकेल.अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.