Sheikh Rashid Ahmed Dainik Gomantak
ग्लोबल

'भारताला अफगाणिस्तानातून पळून जाण्याशिवाय पर्याय नाही'- पाकिस्तानी मंत्री

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) पुढाकार घेतल्यापासून पाकिस्तानमधील हालचालाींना वेग आला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) पुढाकार घेतल्यापासून पाकिस्तानमधील हालचालाींना वेग आला आहे. या दरम्यान पाकिस्तानी (Pakistan) नेतेही अफगाणिस्तान संबंधी मुद्द्यांवर बोलताना भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत. यातच आता पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री शेख रशीद अहमद (Sheikh Rashid Ahmed) यांनी अफगाणिस्तानातील कंधार येथून भारतातील (India) कर्मचार्‍यांना देशामधून काढण्यासांबंधी कडवे टीकास्त्र डागले आहे. शेख रशीद म्हणाले, अफगाणिस्तानातून पळून जाण्याशिवाय भारताकडे पर्याय नव्हता. अफगाणिस्तानाच्या मातीतून भारत पाकिस्तानविरुद्ध दहशतीचे बीज पेरत आहे, असा दावा त्यांनी केला.

मात्र पाकिस्तानी गृहमंत्र्यांचे हे निराधार आरोप भारताने फेटाळले आहेत. शेख रशीद म्हणाले, सध्या भारत अफगाणिस्तानात हास्याचं पात्र म्हणून उरुन राहीला आहे. गेली 40 वर्षे अफगाणिस्तानात राहून भारताने पाकिस्तानविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन दिले. अफगाणिस्तान सोडून पळून जाण्याशिवाय आता भारतापुढे पर्याय नाही. पाकिस्तान अशा ठिकाणी आहे की चीन (China) किंवा अमेरिका (America) असो याकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही. तथापि, आपला देश दहशतीच्या गर्तेत कसा अडकत गेला हे सागंण्यास मात्र ते पुरते विसरले असं दिसतय.

पाकिस्तानी नेते भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकतायत

शेख रशीद पुढे म्हणाले की, आता तालिबान पूर्वी सारखा सूडबुध्दीचा उरला नाही त्याच्यांमध्ये नवे परिवर्तन झाले आहे. अफगाणिस्तान सरकारने तालिबान्यांशी चर्चेच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सक्रिय होताच पाकिस्तानी नेत्यांनी भारताविरुध्द गरळ ओकण्यास सुरु केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारतावर टीकास्र डागत आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून जाण्यावरुन फारच खूष दिसणारे इम्रान खान यांनी अलीकडेच म्हटले होते की, अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यामुळे भारताचा सर्वात मोठा पराभव झाला आहे.

अफगाणिस्तानातील 85 टक्के प्रदेश तालिबानच्या ताब्यात

अमेरिकेने 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून आपले सैन्य बाहेर काढण्यासाठी टाइमलाइन निश्चित केली आहे. अमेरिकन सैनिक वेगाने देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे सैनिकही अफगाणिस्तानातून बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत तालिबान वेगाने अफगाणिस्तानचा ताबा घेण्यात गुंतला आहे. तालिबानचा दावा आहे की, ते 85 टक्के अफगाणिस्तान नियंत्रित करतात. याशिवाय देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेले भागही तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे अफगाण सैनिकांनी शेजारच्या देशांमध्ये पलायन केल्याच्या बातम्याही आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT