China-India Dainik Gomantak
ग्लोबल

Indo-China Relation: भारतीय पत्रकाराला घाबरला चीन, व्हिसाच्या नूतनीकरणास दिला नकार; देश सोडण्याचे दिले आदेश

India China: चीनने भारतीय पत्रकाराला देश सोडण्यास सांगितले आहे. भारताने चिनी पत्रकारांना व्हिसा देण्यास नकार दिल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे.

Manish Jadhav

Indo-China Relation: चीनने भारतीय पत्रकाराला देश सोडण्यास सांगितले आहे. भारताने चिनी पत्रकारांना व्हिसा देण्यास नकार दिल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे. चीनमध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेचा एक पत्रकार आहे.

त्याने व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला होता, मात्र चीनने मान्यता दिली नाही. जणू काही भारत आणि चीन (China) यांच्यात टाय-टॅटचा खेळ सुरु आहे.

सीमेवर सुरु असलेल्या तणावादरम्यान, चीनच्या या कारवाईमुळे दोन्ही देशांतील मीडियाची उपस्थिती संपुष्टात आली आहे.

दरम्यान, भारतीय माध्यमांचे चार पत्रकार चीनमधून वार्तांकन करत होते. त्यापैकी एक पत्रकार हिंदुस्तान टाइम्सचा, दोन प्रसार भारतीचे आणि एक द हिंदू वृत्तपत्राचा होता. एप्रिल महिन्यात चीनने त्यांच्या व्हिसाचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता.

मात्र, चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य केलेले नाही. 2020 मध्ये, पूर्व लडाखमध्ये हिंसक संघर्षानंतर भारत-चीन संबंध बिघडले. तेव्हापासून दोन्ही देश अनेक आघाड्यांवर आमनेसामने आहेत.

चिनी पत्रकार भारतात कोणत्याही अडचणीशिवाय आपले काम करत आहेत

भारताने (India) गेल्या महिन्यात म्हटले होते की, 'भारतात चिनी पत्रकार आपले काम कोणत्याही अडचणीशिवाय करत आहेत. असे असूनही चीनमध्ये भारतीय पत्रकारांना अशी सूट देण्यात आलेली नाही.' या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा होत होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापर्यंत एक चिनी पत्रकार व्हिसा नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत भारतात होता.

यापूर्वी, भारताने शिन्हुआ न्यूज एजन्सी आणि चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या दोन पत्रकारांच्या व्हिसाचे नूतनीकरण केले नाही.

भारतीय पत्रकार सहाय्यकांची नेमणूक करत होते

चीनमधील भारतीय पत्रकार रिपोर्टिंगमध्ये मदत करण्यासाठी स्थानिक सहाय्यकांची नेमणूक करत असताना व्हिसाचा वाद सुरु झाला. चीनमध्ये एकावेळी तीन लोकांनाच रोजगार देता येईल, असा नियम आहे. यामध्ये फक्त तेच लोक आहेत, ज्यांना चीनी अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग दिले आहे. भारतात अशा भर्तीसंबंधी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT