External Affairs Minister S Jaishankar Dainik Gomantak
ग्लोबल

India-Canada Row: निज्जर हत्येचा वाद आणखी गडद, ​​भारताने कॅनडाला पुन्हा सुनावले; जयशंकर म्हणाले...

India-Canada Row Over Hardeep Nijjar Murder: हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद अधिकच गडद होत चालला आहे.

Manish Jadhav

India-Canada Row Over Hardeep Nijjar Murder: हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद अधिकच गडद होत चालला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला होता आणि भारत सुरुवातीपासून या आरोपांना विरोध करत आहे.

निज्जरच्या हत्येशी संबंधित पुरावे कॅनडाने उपलब्ध करुन दिल्यास आम्ही या प्रकरणाची चौकशी करु, असे भारताने पुन्हा एकदा कॅनडाला स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, 'भारत निज्जरच्या हत्येचा तपास करण्यास मागे हटत नाही, परंतु कॅनडाला (Canada) भारतीय एजंटांविरुद्ध पुरावे द्यावे लागतील.' परराष्ट्र मंत्री जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

सप्टेंबर 2023 मध्ये निज्जरची हत्या झाली होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र मंत्री जयशंकर कॅनडाच्या भूमिकेवर खुलेपणाने बोलले. त्यांनी कॅनडावर हिंसक आणि अतिरेकी लोकांना त्यांच्या देशाच्या राजकारणात स्थान दिल्याचा आरोप केला.

जयशंकर म्हणाले की, 'हिंसक आणि अतिरेकी राजकारण करणारे लोक हिंसक मार्गाने भारतात फुटीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असते, पण त्यांच्या काही जबाबदाऱ्याही असतात.'

दुसरीकडे, भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. सप्टेंबर 2023 मध्ये त्याची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी भारतावर निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. भारताने ट्रुडो यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT