India-Canada: कॅनडाचा खोडसाळपणा! खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्याला देशात प्रवेश

khalistani: दहशतवादी निज्जर याची काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या केली होती. कॅनडाने यावरुन भारतावर आरोप केल्याने दोन्ही देशांतील संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. अशात कॅनडा अनेक अक्षेपार्ह गोष्टी करत खोडसाळपणे वागत आहे.
Canada has allowed a man who harbored Khalistani terrorists for 10 years to enter the country.
Canada has allowed a man who harbored Khalistani terrorists for 10 years to enter the country.Dainik Gomantak
Published on
Updated on

Canada has allowed a man who harbored Khalistani terrorists for 10 years to enter the country:

कॅनडातील एका इमिग्रेशन ट्रिब्युनलने, भारतात खलिस्तानी दहशतवाद्यांना तब्बल 10 वर्षे आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीला देशात येण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाची पाठराखण करताना इमिग्रेशन ट्रिब्युनलने म्हटले आहे की, संबंधित व्यक्तीने दहशतवाद्याला भीती आणि बदल्याच्या भीतीने सांभाळले होते.

नॅशनल पोस्ट वृत्तपत्रानुसार, इमिग्रेशन अँड रिफ्युजी बोर्ड ट्रिब्युनल सदस्य हेदी वोर्सफोल्ड यांनी नुकत्याच दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, भारतीय नागरिक कमलजीत राम यांना कॅनडामध्ये प्रवेश करण्यास अयोग्य घोषित करण्यासाठी सरकारकडे कोणतीही कारणे नाहीत. आणि त्यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना भीतीपोटी आश्रय दिल्याने कॅनडात प्रवेश करण्यापासून रोखणे अयोग ठरेल.

Canada has allowed a man who harbored Khalistani terrorists for 10 years to enter the country.
मुलाला संपत्तीतून बेदखल करण्यासाठी कायद्याचे पालन गरजेचे : हायकोर्ट

इमिग्रेशन ट्रिब्युनलने असा निर्णय दिला की, ज्या व्यक्तीने भारतात तब्बल एका दशक सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला त्याला कॅनडामध्ये येण्याची परवानगी दिली पाहिजे कारण त्याने भीतीपोटी आणि बदलाच्या भीतीने असे केले, असे पेपरमध्ये म्हटले आहे.

1982 ते 1992 दरम्यान भारतातील त्याच्या शेतात सशस्त्र शीख दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केल्याचे या व्यक्तीने एका मुलाखतीदरम्यान कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर फेडरल सरकारने या व्यक्तीला कॅनड प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला होता.

Canada has allowed a man who harbored Khalistani terrorists for 10 years to enter the country.
ICC ODI World Cup 2023: विश्वचषक ठरतोय पितृपक्षाला वरचढ, परंपरा मागे सोडत भारतीयांची टिव्ही खरेदीसाठी झुंबड

18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येमध्ये भारतीय एजंटांचा संभाव्य सहभाग असल्याच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील (Canada) राजनैतिक अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आला आहे. निज्जरच्या हत्येचा हा दावा भारताने मूर्खपणाचा आहे असे म्हणत नाकारला आहे.

निज्जर याची दोन बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com