India Ban Onion Export Dainik Gomantak
ग्लोबल

भारताने उचललं मोठं पाऊल... मालदीवसह 5 शेजारी देशांमध्ये उडाला भडका!

India Ban Onion Export: देशातील कांद्याची उपलब्धता आणि किंमत नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

Manish Jadhav

India Ban Onion Export: देशातील कांद्याची उपलब्धता आणि किंमत नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या या पावलाचा परिणाम शेजारी देशांवरही झाला आहे. अहवालानुसार, भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर शेजारील बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीवमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) गेल्या आठवड्यात 8 डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी असेल. याआधी ऑगस्टमध्ये भारताने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क अकारले होते. यानंतर, ऑक्टोबरमध्ये भारताने कांदा निर्यातीसाठी किमान किंमत $ 800 प्रति टन वाढवली होती. ही मुदत 31 डिसेंबरला संपत असताना कांदा निर्यातीवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बांगलादेशात कांद्याची किंमत

दरम्यान, भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर बांगलादेशमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बांगलादेशात कांद्याचा भाव 200 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर दारुबंदीच्या अवघ्या एक दिवस आधी कांद्याचा भाव 130 रुपये किलो होता. कांद्याच्या किमतीत झालेल्या वाढीबाबत ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशने म्हटले आहे की, आठवडाभरापूर्वी हाच कांदा 105-125 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. जो सध्या 180 ते 190 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. आम्ही घाऊक बाजारात कांदा 90 ते 100 रुपये किलो दराने घ्यायचो. आता तोच कांदा 160 ते 170 रुपये किलो दराने खरेदी करत आहोत.

भूतानमध्ये कांद्याची किंमत

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भूतानमध्येही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भूतानमध्ये 150 नगल्ट्रम प्रति किलोग्रॅम दराने कांदा विकला जात आहे. राजधानी थिम्पूतील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, पूर्वी हा कांदा 50 ते 70 नगल्ट्रम प्रति किलो दराने विकला जात होता. भूतान ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसच्या अहवालानुसार, भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर भूतानच्या इतर शहरांमध्येही कांद्याचे भाव 100 नगल्ट्रमवर पोहोचले आहेत.

नेपाळ पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे

भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या निर्बंधानंतर नेपाळमध्ये कांद्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. 100 रुपये किलोने कांदा विकला जात होता. आता हाच कांदा 200 रुपये किलोने विकला जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, कांद्याचे भाव आणखी वाढतील, कारण नेपाळ मोठ्या प्रमाणात भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर अवलंबून आहे. कांद्याच्या आयातीसाठी नेपाळ जवळजवळ पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारताने घातलेल्या बंदीमुळे नेपाळमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात नेपाळने भारतातून सुमारे 190 टन कांदा आयात केला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये भारताने कांदा निर्यातीवर बंदी घातली तेव्हा नेपाळमध्ये कांद्याची किंमत प्रति किलो 250 रुपये झाली होती.

मालदीवही कांद्यासाठी भारतावर अवलंबून आहे

नेपाळप्रमाणेच मालदीवही भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर अवलंबून आहे. अशा स्थितीत स्थानिक बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. अहवालानुसार, भारताने बंदी घालण्यापूर्वी मालदीवमध्ये कांदा 200 ते 350 रुफिया प्रति पॅकेटने विकला जात होता. तोच कांदा आता 500 रुपये प्रति पॅकेट ते 900 रुपये प्रति पॅकेट विकला जात आहे.

तथापि, मालदीवचे अर्थमंत्री मोहम्मद सईद यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की भारताने लादलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे मालदीवला कांदा खरेदीमध्ये कोणत्याही व्यत्ययाचा सामना करावा लागत नाही. खरे तर, भारताने मालदीवसह काही देशांनाही सूट दिली आहे. पण सध्या मालदीव कांद्यासाठी पाकिस्तान आणि चीनवर जास्त अवलंबून आहे. मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांचा पक्ष चीन समर्थक म्हणून पाहिला जात आहे. माजी राष्ट्रपती सोलिह यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी मुइज्जू यांच्या पक्षाने निवडणुकीत 'इंडिया-आउट' मोहिमेचा नारा दिला होता. याशिवाय, मुइज्जू सरकारने मालदीवमधील भारतीय लष्करी उपस्थिती हटवण्यास सांगितले होते. त्यानंतर भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे.

श्रीलंकेतही कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत

डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या स्थानिक बाजारात कांद्याची किंमत 300 रुपये प्रति किलो पॅकेट झाली आहे. व्यापारी संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की, आयातदार पर्यायी पुरवठादार शोधत आहेत. पण आमच्यासाठी वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाणे आव्हानात्मक आहे कारण कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

SCROLL FOR NEXT