India Export : जुलैमध्ये देशाची निर्यात वाढली, व्यापारी तूटही विक्रमी पातळीवर

जुलैमध्ये देशाची निर्यात 2.14 टक्क्यांनी वाढून $36.27 अब्ज झाली आहे.
India Export in July 2022
India Export in July 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

जुलैमध्ये देशाची निर्यात 2.14 टक्क्यांनी वाढून $36.27 अब्ज झाली आहे. त्याच वेळी, कच्च्या तेलाच्या किमतीत 70 टक्के वाढ झाल्यामुळे, त्याच महिन्यात व्यापार तूट जवळजवळ तिप्पट होऊन $30 अब्ज झाली आहे. जुलै 2021 मध्ये व्यापार तूट $10.63 अब्ज होती.

India Export in July 2022
Herbal Tea Side Effects : हर्बल चहा जास्त प्यायल्याने होऊ शकते नुकसान; जाणून घ्या

वार्षिक आधारावर आयात किती वाढली?

अधिकृत आकडेवारीनुसार, जुलैमध्ये आयात वार्षिक 43.61 टक्क्यांनी वाढून $66.27 अब्ज झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार जुलैमध्ये निर्यात 0.76 टक्क्यांनी घसरून $35.24 अब्ज होईल. जुलै 2021 मध्ये ते $35.51 अब्ज होते.

4 महिन्यांत 48 टक्के वाढ

त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै कालावधीत निर्यात 20.13 टक्क्यांनी वाढून $157.44 अब्ज झाली आहे, तर या चार महिन्यांत आयात 48.12 टक्क्यांनी वाढून $256.43 अब्ज झाली आहे.

व्यापार तूटही वाढली

या कालावधीत व्यापार तूटही $98.99 अब्ज इतकी वाढली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ते $42 अब्ज होते. कच्च्या तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची आयात या वर्षी जुलैमध्ये $21.13 अब्ज होती, जी जुलै 2021 मध्ये $12.4 अब्जच्या तुलनेत 70.4 टक्क्यांनी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com