India Export: जय हो मोदी सरकार! परदेशातून केली करोडोंची कमाई, अर्थसंकल्पापूर्वी...

Budget 2023: 2023 वर्ष सुरु झाले आहे. लोकांनाही नवीन वर्षात अनेक नवीन गोष्टी कराव्या लागणार आहेत. यातच सरकार नवीन वर्षात नवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Budget 2023: 2023 वर्ष सुरु झाले आहे. लोकांनाही नवीन वर्षात अनेक नवीन गोष्टी कराव्या लागणार आहेत. यातच सरकार नवीन वर्षात नवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. काही आठवड्यात केंद्र सरकारकडून केंद्रीय अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून जनतेसाठी अनेक कल्याणकारी घोषणाही केल्या जाऊ शकतात. दरम्यान, 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी सरकारकडून बरीच माहिती देण्यात आली आहे.

बजेट

केंद्र सरकारकडून (Central Government) अर्थसंकल्पापूर्वी माहिती देताना सांगण्यात आले की, भारताच्या निर्यातीत वाढ झाली असून ही तेजी भारतीय सेवा निर्यातीत दिसून आली आहे. एका वर्षात भारताची (India) सेवा निर्यात 30 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यामुळे भरपूर फायदाही होतो. सरकारच्या वतीने ट्विट करुन ही माहिती देण्यात आली आहे.

PM Narendra Modi
Budget 2023: मोदीजी तुम्हीच! नव्या अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिलेले आश्वासन केले पूर्ण

भारत सरकार

MyGovIndia च्या वतीने ट्विट करुन भारताच्या वाढत्या सेवा निर्यातीची माहिती देण्यात आली आहे. MyGovIndia ने ट्विट केले आहे की, भारताच्या सेवा निर्यातीत तेजी आली आहे. केंद्र सरकारच्या ट्विटनुसार, भारत परदेशातही आपली सेवा देत आहे, त्यामुळे देशाला करोडो रुपयांचा फायदा होत आहे.

PM Narendra Modi
BUDGET 2023: स्वप्नातील घर होणार साकार, अर्थमंत्री 'या' दिवशी करणार मोठी घोषणा?

बजेट 2023

MyGovIndia ने ट्विटसोबत एक फोटो शेअर केला आहे. भारतीय सेवा निर्यातीत 31.5 टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिल-ऑक्टोबर 2021-22 मध्ये भारतीय सेवा निर्यात $138 अब्ज होती, तर एप्रिल-ऑक्टोबर 2022-23 मध्ये भारतीय सेवा निर्यात $181 अब्ज झाली आहे. अशा स्थितीत, परदेशातून होणाऱ्या निर्यातीतून देशाला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com