Russia Vs Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: किव्हच्या रस्त्यांवर झुंज

रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले; युक्रेनकडून जबरदस्त प्रत्युत्तर

दैनिक गोमन्तक

किव्ह: रशिया-युक्रेन संघर्षाला आज तिसऱ्या दिवशी निर्णायक वळण मिळाले, रशियाच्या फौजा थेट युक्रेनच्या राजधानीमध्ये घुसल्याने आता रस्त्यांवरची लढाई सुरू झाली आहे. रशियन लष्कराने आज अनेक बहुमजली इमारतींवर थेट क्षेपणास्त्रे डागल्याने स्थानिकांना जीव वाचविण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. फ्रान्सप्रमाणेच अन्य युरोपीय देशांनीही युक्रेनला शस्त्र पुरवठा करायला सुरूवात केली आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी तर हे ‘युद्ध बराच काळ चालेल’ असा इशारा दिल्याने जगाच्या चिंता वाढल्या आहेत. युक्रेनच्या अध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर धुडकावून लावत देश सोडण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आपण येथेच राहून रशियाशी दोन हात करू असे त्यांनी म्हटले आहे.

युक्रेनमधील गोमंतकीय सुखरूप

युक्रेनमध्ये काही विद्यार्थी असून ते सर्व सुखरूप आहेत. त्यांनाही रोमानिया किंवा पोलंडमार्गे भारतात आणण्यात येईल, अशी माहिती गोव्याच्या अनिवासी भारतीय व्यवहार विभागाचे अँथनी डिसुझा यांनी गोमन्तकला दिली. तर एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी सांगितले की, निश्चित आकडा माहिती नाही, पण युक्रेनमधील मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिथल्या नऊ विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क केला आहे.

युक्रेनच्या अध्यक्षांचा मोदींना फोन:

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मदतीची मागणी केली. एक लाख सैनिकांनी आमच्या घरांवर हल्ले केले असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये आपण आम्हाला राजकीय पाठिंबा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

रशियाकडून यूएनमधील भारताच्या भूमिकेचे स्वागत युक्रेनच्या खारकिव्हमध्ये रशियाचे हवाई हल्ले झेक प्रजासत्ताक, पॅराग्वेकडून युक्रेनला शस्त्रे यूएनच्या सुरक्षा परिषदेत भारताची तटस्थ भूमिका युक्रेनमधील नऊ हजार लोक पोलंडमध्ये आश्रयाला अमेरिकेकडून युक्रेनला तातडीची आर्थिक मदत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT