नागझर येथे ऊसाला आग शेती खाक; लाखोंची हानी

शेती खाक; लाखोंची हानी
Sugarcane fires at Morjim
Sugarcane fires at MorjimDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : नागझर-पेडणे येथे ऊसाच्या मळ्याला आज शनिवारी दुपारी लागलेल्‍या आगीत सुमारे 22 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दल पोचण्यापूर्वीच शेती पूर्णपणे जळून गेली. नागझर परिसरात तिळारी नदी कालव्याच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांनी ऊस, केळी, मिरची आदींची शेती केली होती.

आज दुपारी अचानक या शेतीच्या मळ्यांना आग (fire) लागली. त्‍यात सर्व शेती नष्ट झाली. शेतकरी आपल्या घरी जेवायला गेल्यानंतर अचानक आग लागल्याने ती विझवण्यासाठी कोणीच नव्हते. शेतकऱ्यांना जेव्हा माहिती कळली तेव्‍हा त्‍यांनी तात्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली, पण काही उपयोग झाला नाही.

Sugarcane fires at Morjim
मडगावमध्ये बेकायदा रेती वाहतूक प्रकरणी तरुणाला अटक

पूर्णपणे जळून गेलेली शेतीच त्‍यांच्‍या नजरेस पडली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्‍यामुळे शेतकरी हतबल झाले. कोणीच प्रतिक्रिया द्यायच्‍या मन:स्थितीत नव्हता.
शेतीला (Agriculture) संरक्षण मिळावे म्हणून सरकारमार्फत (Government) योजनेअंतर्गत तारेचे कुंपण घालण्‍यात आले होते. तरीही दुर्घटना घडलीच. परिणामी 22 शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. गतसाली अशीच आग लागून नुकसानी झाली होती. मात्र सरकारकडून अजूनपर्यंत काहीच नुकसानी मिळालेली नाही.

Sugarcane fires at Morjim
मडगावमध्ये बेकायदा रेती वाहतूक प्रकरणी तरुणाला अटक

जमिनी गेल्या, आता उत्पन्नही गेले!

नागझर येथील या शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्‍पांसाठी मोठ्या प्रमाणात गेल्‍या आहेत. त्‍यात मोपा विमानतळ आणि लिंक रोड प्रामुख्‍याने सामावेश होतो. रहिलेल्‍या जमिनींत शेतकऱ्यांनी शेती केली होती. तेच उत्पन्न आता आगीने खाक झाल्‍याने या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. सरकारने आपल्‍याला ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com