imran khan
imran khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Politics: इम्रान खान यांच्याविरोधात 'Dirty Politics', अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी...

दैनिक गोमन्तक

Pakistan Dirty Politics: पाकिस्तानच्या राजकारणात दररोज काही ना काही मोठी उलथापालथ होत आहे. इम्रान खान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आणि त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर शेजारील देशात रोज एक नवे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. देशात नव्याने सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या मागणीवर इम्रान खान ठाम आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचे सध्याचे सरकार निवडणुका घेण्याचा विचार करत नाही. दरम्यान, देशाच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यावर मोठी कारवाई करण्याचे ठरवले आहे.

पाक निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तोषखाना प्रकरणात त्यांना संसद (Parliament) सदस्यत्वासाठी अपात्र ठरवल्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले आहे. डॉन वृत्तपत्राने ईसीपीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले की, 'माजी पंतप्रधानांना नोटीस बजावण्यात आली असून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 डिसेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.'

इम्रान यांच्यावर गंभीर आरोप

इम्रान खान (खान) यांच्यावर पंतप्रधान असताना तोषखान्यातून मिळालेली महागडी घड्याळे आणि इतर भेटवस्तू सवलतीच्या दरात खरेदी केल्यानंतर नफ्यात विकल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना घटनेच्या कलम 63(i)(p) अन्वये या संदर्भात "चुकीचे निवेदन आणि खोटी घोषणा" केल्याचा आरोप करुन अपात्र ठरवले आहे.

जाणून घ्या काय आहे प्रकरण

निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार, 1974 मध्ये स्थापन झालेल्या तोषखान्यातून 2.15 कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या, तर त्यांची वास्तविक किंमत 10.8 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे, पाकिस्तानी कायद्यानुसार, सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू त्यांच्याकडे ठेवण्यापूर्वी मूल्यांकनासाठी तोषखाना किंवा तिजोरीत जमा कराव्या लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT