Pakistan Army: पाक लष्करात मोठी खळबळ, पूर्व ISI प्रमुखांनी निवृत्तीची केली मागणी

Pakistan New Army Chief Appointment: आज पाकिस्तानला लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्या रुपाने नवा लष्करप्रमुख मिळणार आहे.
General Hamid
General HamidDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan New Army Chief Appointment: आज पाकिस्तानला लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्या रुपाने नवा लष्करप्रमुख मिळणार आहे. मात्र ते लष्करप्रमुख बनताच पाक लष्करात खळबळ उडाली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) चे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांनी मुनीर प्रमुख होताच लष्करातून तात्काळ निवृत्तीसाठी अर्ज केला आहे.

जिओ न्यूजनुसार, सध्या बहावलपूरचे कॉर्प्स कमांडर म्हणून कार्यरत असलेले जनरल हमीद (General Hamid) हे पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. लष्करप्रमुख पदासाठी नामांकन झालेल्या सहा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. मात्र, त्यांनी तात्काळ निवृत्तीची विनंती रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयाकडे केली आहे.

General Hamid
New Army Chief Of Pakistan: पुलवामाचा कट रचणाऱ्या भारताच्या 'शत्रू'ला पाकिस्तानने बनवले लष्करप्रमुख

लष्करप्रमुखपदाचे दावेदार होते

पाकिस्तान सरकारने जनरल असीम मुनीर यांची नवे लष्करप्रमुख आणि जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर तात्काळ निवृत्ती घेण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराचे (Pakistan Army) चीफ ऑफ जनरल स्टाफ (CGS) लेफ्टनंट जनरल अझहर अब्बास यांनीही तात्काळ निवृत्तीची मागणी केली होती. ते सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही आहेत. विशेष म्हणजे, लष्करप्रमुखपदाच्या दावेदारांमध्येही त्यांचे नाव होते.

लष्करप्रमुख न झाल्यामुळे अझहर अब्बासही संतापले

जिओ न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वासाठी ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल अझर अब्बास यांनी तात्काळ निवृत्ती घेण्याची घोषणा केली. सूत्रांवर विश्वास ठेवल्यास, ते नवीन लष्करप्रमुख होतील याची त्यांना पूर्ण खात्री होती, परंतु त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते खूप नाराज असल्याचे बोलले जात आहे.

General Hamid
Pakistan Army Chief: सय्यद असीम मुनीर बनले पाक लष्कराचे नवे जनरल

अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली

जनरल अब्बास यांच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास, पाकिस्तान मिलिटरी अकादमीतून पास आऊट झाल्यानंतर 1987 मध्ये त्यांना 41 बलुच रेजिमेंटमध्ये कमिश्नर झाले. सध्या ते जनरल स्टाफचे प्रमुख आहेत. त्यांचे सध्याचे पद सीजीएसचे आहे. या जबाबदारीपूर्वी ते रावळपिंडीतील एक्स कॉर्प्सचे प्रमुखही राहिले आहेत. या पोस्टवर असताना भारत आणि पाकिस्तान लष्करामध्ये 2003 मध्ये एलओसीवर युद्धविराम करार झाला होता. लेफ्टनंट जनरल अब्बास हे मुरी येथील 12 इन्फंट्री डिव्हिजनचे प्रमुखही राहिले आहेत. इथेही त्यांनी जबाबदारी चोख पार पाडली. त्यानंतर काश्मीरची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com