Imran Khan
Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांनी भारताला दिली युद्धाची धमकी!

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जगातील एक मोठा मुस्लिम नेता म्हणून आपली ओळख निर्माण करायची आहे, मात्र चीनला भेट दिल्यानंतर तेच इम्रान खान तेथे राहणाऱ्या उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल चीन (China) सरकारची बाजू घ्यायला मागेपुढे पाहत नाही. एका मुलाखतीत त्यांनी भारताला (India) युद्धची धमकी दिली आहे. (War Between India-Pakistan Latest News)

त्यांनी शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या उइघुर लोकांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष तर केलेच पण पाश्चिमात्य देशांवर चीन सरकारची प्रतिमा डागाळल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणतात की शिनजियांगमधील उइगरांची परिस्थिती पाश्चात्य देश चित्रित करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. इम्रान खान (Imran Khan) यांनी शिनजियांग प्रांतात जे काही चालले आहे त्यासाठी चीनचे समर्थन तर केले आहेच, शिवाय दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायाही योग्य ठरल्या आहेत. बीजिंग दौऱ्यात इम्रान खान यांनी चीनच्या वन चायना धोरणाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. संयुक्त निवेदनात त्यांनी तिबेट, हाँगकाँगमधील चीनच्या धोरणांचे समर्थन केले आहे.

इम्रान खान यांना जेव्हा उइगरांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुन्हा काश्मीरचा राग काढला आणि मोदी सरकारला तेथे आरएसएसची विचारधारा लागू करायची आहे, असे सांगितले. जोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये युद्धाचा धोका कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

चिनी सरकारच्या धोरणांचा जोरदार पुरस्कार करत, त्यांनी एका दिलेल्या मुलाखतीत असेही सांगितले की त्यांचे चीनमधील राजदूत मिनुल हक यांनी शिनजियांग प्रांताला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान त्यांना असे आढळून आले की, तेथे राहणाऱ्या उइघुरांची स्थिती पाश्चात्य देश जगाला दाखवत आहेत तशी नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तान आणि चीन अनेक वर्षांपासून खूप जवळ आहेत. कर्ज आणि शस्त्रास्त्रांसाठी पाकिस्तान चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पाकिस्तानवर चीनचे अब्जावधी डॉलर्सचे कर्ज आहे.

इम्रान खान अनेक दिवसांपासून स्वत:ला जगातील एक मोठा मुस्लिम नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी शिनजियांगमधील चीनच्या धोरणांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जगातील अनेक देश आणि मानवाधिकार संघटना चीनवर उइगरांवर अत्याचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. मात्र, चीनला पूर्ण पाठिंबा देण्यामागची पाकिस्तानची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची आर्थिक कमजोरी. या मजबुरीखाली त्यांना चीनसोबतचे राजनैतिक संबंध बिघडवायचे नाहीत. यामुळेच त्यांच्याकडे चीनला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेही एके काळी त्यांच्या अगदी जवळ असलेल्या अमेरिकेने त्यांना स्वतःपासून दूर केले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला कोणताही धोका पत्करायचा नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT