Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान बनले PM मोदींचे जबरा फॅन! या मुद्यावरुन पुन्हा केले कौतुक

Imran Khan Comment on PM Modi: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान मागील काही दिवसापासून जाहीरसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Imran Khan lauds PM Modi: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान मागील काही दिवसापासून जाहीरसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. यातच आता त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले आहे. पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी भारताच्या पंतप्रधानांकडून शिकले पाहिजे, असे इम्रान खान म्हणाले आहेत.

'नवाझ शरीफ यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती जमा आहे'

एका सभेत बोलताना पाकिस्तान तहरीक इन्साफ पक्षाचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला. इम्रान म्हणाले की, 'नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानातच नव्हे तर परदेशातही अब्जावधी रुपयांची संपत्ती जमा करुन ठेवली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात संपत्ती असलेले नवाझ शरीफ यांच्याशिवाय जगात दुसरा कोणता नेता नाही.'

'पंतप्रधान मोदींची परदेशात कोणतीही संपत्ती नाही'

जनतेला संबोधित करताना इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, 'नवाझ शरीफ यांच्याकडे किती संपत्ती आहे, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.' ते पुढे म्हणाले की, 'जगातील एका नेत्याचे नाव सांगा, ज्याने देशाबाहेर इतक्या मोठ्याप्रमाणात संपत्ती जमा करुन ठेवली असेल. शेजारील भारताकडेही बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाबाहेर कोणत्याही स्वरुपाची संपत्ती नाही.'

यापूर्वीही भारताचे कौतुक केले आहे

इम्रान खान यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या धोरणांचे खुलेपणाने कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इम्रान यांनी पाश्चात्य देशांच्या आक्षेपानंतरही रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. दुसरीकडे, शाहबाज शरीफ सरकारवर टीका करताना इम्रान खान यापूर्वी म्हणाले होते की, 'भारत अमेरिकेचा मित्र असूनही आपल्या देशाच्या हितासाठी रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत आहे. त्याचवेळी, पाकिस्तान सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.'

'भारतावर कोणीही हुकूमशाही करु शकत नाही'

यापूर्वी, इम्रान यांनी भारताचे (India) कौतुक केले होते. भारत हा प्रामाणिक देश आहे, असेही इम्रान खान म्हणाले होते. भारताने काय करावे आणि काय करु नये हे कोणतीही महासत्ता त्यांना सांगू शकत नाही. आपल्या देशाच्या धोरणांवर बोलताना इम्रान खान म्हणाले होते की, 'भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले, स्वातंत्र्यांनतर भारताने प्रगतीचे नव-नवे उच्चांक गाठले मात्र पाकिस्तान (Pakistan) प्रगती करण्यात अपयशी ठरला.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT