Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: इम्रान खान धास्तावले, नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीवरुन केले हे वक्तव्य

इम्रान खान यांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

दैनिक गोमन्तक

Imran Khan: इम्रान खान यांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. देशभर दौरे करत ते ठिकठिकाणी जाहीर सभाही घेत आहेत. पुन्हा एकदा नव्याने निवडणुका घेण्यासाठी शरीफ सरकारवर ते सातत्याने दबाव आणत आहेत. दरम्यान, नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीमुळे इम्रान खान चांगलेच घाबरले आहेत. सध्याचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या इम्रान खान यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी सरकारला जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ निवडणुकीपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान म्हणाले की, 'नवे सरकार स्थापन होईपर्यंत लष्करप्रमुखांची नियुक्ती पुढे ढकलली पाहिजे. नवीन लष्करप्रमुखाची निवड नव्या सरकारने करावी.' ते पुढे म्हणाले, 'लष्करप्रमुखांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारे व्हायला हवी. असिफ अली झरदारी किंवा नवाझ शरीफ दोघेही 'गुणवत्ता' निकषावर पात्र ठरत नाहीत.'

इम्रान खान यांचा अंतरिम जामीन 20 सप्टेंबरपर्यंत वाढवला

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. ते सोमवारी दहशतवादविरोधी न्यायालयात हजर झाले. पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर सरकारी संस्थांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने (Court) त्यांना 20 सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

ही घटना 20 ऑगस्टची आहे. इम्रान खान इस्लामाबादमधील एफ-9 पार्कमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीश, अधिकारी आणि सरकारविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याच त्यांच्या वक्तव्यांना सरकारने प्रक्षोभक भाषण मानले होते. इम्रान खान देशातील जनतेला सरकार, न्यायालय आणि लष्कराविरोधात भडकवत असल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला होता. देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती त्यांना निर्माण करायची असल्याचे सरकारचे म्हणणे होते. यानंतर शरीफ सरकारने इम्रान खान यांच्यावर दहशतवादाचा गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT