Pakistan: शाहबाज सरकारची दडपशाही सुरुच, दोन वृत्तवाहिन्यांवर पुन्हा घातली बंदी

Shahbaz Sharif Government: पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारने प्रसारमाध्यमांवर पुन्हा एकदा प्रहार केला आहे.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomamntak

Shahbaz Sharif Government In Pakistan: पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारने प्रसारमाध्यमांवर पुन्हा एकदा प्रहार केला आहे. सरकारने दोन वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. शाहबाज सरकारची या वाहिन्यांवर बऱ्याच दिवसांपासून वाकडी नजर होती. या चॅनलवर केवळ इम्रान खान यांना पाठिंबा देणार्‍या बातम्या दाखवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यातच बंदी लागू होताच इम्रान खान यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

बंदी घालताना दिलेले कारण

खरे तर, पाकिस्तानातील मीडिया वॉचडॉग असलेल्या पेमरा यांनी सोमवारी आपल्या एका आदेशात कराचीस्थित (Karachi) बोल न्यूज आणि बोल एंटरटेनमेंट या दोन टीव्ही चॅनेलचे प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेतला. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही चॅनेल्सवर बंदी घालताना त्यांचे प्रक्षेपण का बंद करण्यात आले, याचेही कारण देण्यात आले आहे.

Shehbaz Sharif
शाहबाज सरकार भारतापुढे झुकले! पाकिस्तानी संतप्त

परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला

अहवालानुसार, या दोन वाहिन्यांच्या संदर्भात गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळेपर्यंत चॅनेल चालवण्याची परवानगी देता येणार नाही. सरकारी आदेशानुसार, गृह मंत्रालयाने सर्व रेकॉर्ड, न्यायालयाचे (Court) आदेश आणि नोटिसांचे पुनरावलोकन केले. त्यानंतर बोल न्यूज आणि बोल एंटरटेनमेंट चॅनलचा परवाना तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Shehbaz Sharif
Pakistan: शाहबाज सरकारची दडपशाही सुरुच, दोन वृत्तवाहिन्यांवर पुन्हा घातली बंदी

माजी पंतप्रधान इम्रान भडकले

दुसरीकडे, दोन्ही वाहिन्यांवर बंदी लागू होताच माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) चांगलेच भडकले. खान यांनी म्हटले की, 'आज आपण पाकिस्तानमध्ये फॅसिझम आणि सेन्सॉरशिप पाहत आहोत, याआगोदर कधीही आपण अशा प्रकारची सेन्सॉरशिप पाहिली नव्हती. सरकार मीडिया आणि पत्रकारांवर सेन्सॉरशिप लादत आहे. आणि त्यांना केवळ त्रास देत आहे. आता बोल न्यूजचा परवाना रद्द करण्यात आला आहे, कारण ते आमचं कव्हरेज करत होते.'

Shehbaz Sharif
Pakistan: शाहबाज शरीफ यांच्या मुलाला SC चा दणका, पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरुन हटवले

याआधीही, शाहबाज सरकारने मीडियावर कारवाई करताना वाहिन्यांवर बंदी घातली होती. काही दिवसांपूर्वी देशातील प्रसिद्ध ARY वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले होते. जेव्हा पाकिस्तान (Pakistan) सरकारचा एक आदेश समोर आला होता. या आदेशानुसार या वाहिनीच्या प्रसारणावर तात्काळ बंदी घालण्यात आली. आता पुढील आदेश येईपर्यंत या वाहिनीचे प्रसारण बंद असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com