Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: तुरुंगात जाण्याच्या भीतीने इम्रान यांची उडाली झोप, करावे लागले रुग्णालयात भरती; Video

Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान तुरुंगात जाण्याच्या भीतीने हादरले आहेत.

Manish Jadhav

Imran Khan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान तुरुंगात जाण्याच्या भीतीने हादरले आहेत. शनिवारी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. इम्रान यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली आणि तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याची मागणी केली.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे चार तास थांबल्यानंतर पीटीआय नेते इम्रान खान हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि त्यांच्या घरी परतले. शुक्रवारी दुपारपासून इम्रान यांना अस्वस्थ वाटत होते.

त्यानंतर त्यांना कडक सुरक्षेत रुग्णालयात नेण्यात आले. चार तास हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर इम्रान घरी परतले. शनिवारी पहाटे रुग्णालयात (Hospital) पोहोचल्यानंतर विशेष डॉक्टरांच्या पथकाने इम्रान खान यांची आरोग्य तपासणी केली. त्यांच्या पोटाच्या समस्येचे कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या.

दुसरीकडे, 9 मे रोजी शाहबाज सरकारने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (IHC) परिसरातून त्यांना (Imran Khan) अटक केली होती. पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर घोषित करेपर्यंत ते काही दिवस कोठडीत होते.

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, इम्रान यांना आयएचसीसमोर हजर करण्यात आले आणि 12 मे रोजी त्यांच्याविरुद्धच्या सर्व खटल्यांमध्ये दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

SCROLL FOR NEXT