Imran Khan: इम्रान खान यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, 123 PTI कार्यकर्त्यांची केली सुटका!

Imran Khan: पाकिस्तानातील राजकीय स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
PTI Workers
PTI WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

Imran Khan: पाकिस्तानातील राजकीय स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यातच, इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

लाहोर उच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या पक्ष 'पीटीआय'च्या 123 समर्थकांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

इम्रान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे या समर्थकांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता लाहोर उच्च न्यायालयाने आपल्या आदेशान्वये इम्रान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या 123 कार्यकर्त्यांना विलंब न करता मुक्त करण्याचे निर्देश दिले.

सुनावणीदरम्यान इम्रान समर्थकांची सुटका करण्याचे आदेश दिले

पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोर उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायाधीश अन्वारुल हक यांनी पीटीआय नेते फारुख हबीब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली.

या सुनावणीदरम्यान इम्रान समर्थकांच्या सुटकेचे आदेश जारी करण्यात आले. अटकेत असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली.

PTI Workers
Pakistan Political Crisis: इम्रान खान यांच्या घरातून 14 दहशतवाद्यांना अटक; शाहबाज सरकारचा दावा

असे आवाहन मानवाधिकार गटाने केले आहे

फैसलाबाद येथून अटक करण्यात आलेले हे कार्यकर्ते सध्या पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या तुरुंगात बंद आहेत. दरम्यान, हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या 4,000 हून अधिक लोकांचे मानवी हक्क विचारात घेण्याची विनंती मानवाधिकार गटांनी सरकारकडे केली आहे.

9 मे रोजी इम्रान यांच्या अटकेनंतर हिंसाचार पसरला होता

इम्रान खान यांना पाकिस्तान रेंजर्सने 9 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती.

यानंतर पाकिस्तानात हिंसाचार उसळला होता. पाकिस्तानच्या (Pakistan) इतिहासात पहिल्यांदाच, आंदोलकांनी रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावर (जीएचक्यू) हल्ला केला आणि लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊस (जिना हाऊस) देखील पेटवले.

PTI Workers
Imran Khan Bail: अखेर इम्रान खान यांना जामिन मंजूर; 17 मे पर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

पोलिसांनी सांगितले की 10 समर्थकांचा मृत्यू झाला, तर पीटीआयने 40 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, देशातील या हिंसक निदर्शनांमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर खान यांच्या पक्षाचा दावा आहे की, त्यांचे 40 कार्यकर्ते आतापर्यंत ठार झाले आहेत.

विशेष म्हणजे, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी पाकिस्तानमध्ये 7 हजारांहून अधिक पीटीआय कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांपैकी 4 हजारांहून अधिक कार्यकर्ते एकट्या पंजाबमधील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com