Imran Khan: Encourage the new Government of Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांचा पुन्हा तालिबानी राग, अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांना प्रोत्साहन द्या

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता मिळावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan Prime Minister) इम्रान खान (Imran) यांनी पुन्हा एकदा तालिबानची (Taliban) बाजू घेतली आहे. इम्रान म्हणाले की, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) नवीन राज्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे जेणेकरून ते त्यांचे वचन पूर्ण करू शकतील. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने 1996 पासून 2001 पर्यंत त्यांच्या राजवटीपासून वेगळे सर्वसमावेशक सरकार स्थापनेची घोषणा केली (Taliban Government). त्यांनी धर्मांधता सोडून सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्याची घोषणा केली होती. तथापि, त्याच्या अलीकडील हालचाली सूचित करतात की ते आपल्या जुन्या धोरणांकडेच परत येत आहेत. (Imran Khan: Encourage the new Government of Afghanistan)

एका अधिकृत निवेदनानुसार, अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या लेखात इम्रान खान यांनी 'जगाला सर्वसमावेशक सरकारची अपेक्षा आहे, जे अधिकारांचे संरक्षण करू शकेल आणि असे सरकार जे अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरू देणार नाही.'असे विधान केले आहे. 'तालिबान्यांकडे त्यांची आश्वासने पूर्ण करण्याचे कारण आणि क्षमता सुद्धा आहे, परंतु सरकार चालवण्यासाठी त्यांना सतत मानवतावादी आणि विकास सहाय्याची गरज आहे आणि याच मदतीने जगातील देश तालिबानवर आश्वासने पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवू शकतात.'असे म्हणत त्यांनी तालिबानला मान्यता देण्यासाठी पुन्हा एकदा आग्रह धरला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता मिळावी यासाठी पाकिस्तानने बरेच प्रयत्न केले आहेत. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे.

दरम्यान अलीकडेच तालिबानच्या प्रवक्त्याने इम्रान खान यांना फटकारले होते की, ते स्वतः एक कठपुतळी आहेत, ज्यांना पाकिस्तानच्या लोकांनी निवडले नाही. तालिबानच्या प्रवक्त्याने पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेप करू नये असे आवाहन केले होते . तालिबानचे प्रवक्ते म्हणाले, "ज्याप्रमाणे आम्ही इतर कोणत्याही देशाच्या व्यवहारात हस्तक्षेप करत नाही, त्याचप्रमाणे इतर कोणत्याही देशाने आमच्या व्यवहारात हस्तक्षेप करू नये अशी आमची इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT