अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर पाकिस्तान आणि चीन या सरकारला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यातच आता अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. यानंतर तालिबान सरकारला (Taliban Government) मान्यता देण्यासाठी त्यांच्या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अशरफ गनी यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन (Ashraf Ghani Facebook Account Hacked) पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाला सुन्नी पश्तून ग्रुपच्या कारवायांना मदत करण्याची आणि अफगाणिस्तानच्या मालमत्तेवर लादलेली बंदी उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी राष्ट्रपती अशरफ घनी 15 ऑगस्ट रोजी काबूलमधून (Kabul) पळून गेले. त्यांनी सोमवारी ट्विटरवरुन म्हटले की, कालपासून त्यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या खात्यातून प्रकाशित केली जात असलेली माहिती बेकायदेशीर आहे, जोपर्यंत खाते पुन्हा त्यांच्याद्वारे नियंत्रित केले जात नाही तोपर्यंत त्या माहितीची सत्यता पडताळून घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे. घनीने पश्तोभाषेमध्ये ट्विट करत म्हटले की, 'डॉ. मोहम्मद अशरफ घनी यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. जोपर्यंत ते पुन्हा नियमन केले जात नाही, तोपर्यंत कालपासून फेसबुक पेजवर प्रकाशित केलेली सामग्री वैध ठरणार नाही. 'त्याचवेळी, फेसबुक पोस्ट नंतर काढून टाकण्यात आली आहे, आणि सामग्री स्वतंत्रपणे सत्यापित केली जाऊ शकत नाही.
अशरफ गनी यांच्यावरील आरोप
गेल्या महिन्यात तालिबान्यांनी काबूलला वेढा घातल्यानंतर अशरफ घनी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये पळून गेले. त्याचबरोबर तालिबानने घनी यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली नाही. परंतु अतिरेकी गटाने माजी अध्यक्षांवर चार कार, रोख रकमेने भरलेली बॅग आणि हेलिकॉप्टर नेल्याचा आरोप केला आहे. या गोष्टी तालिबान्यांनी तालिबान सरकारकडे परत करण्याची मागणी केली आहे. तथापि, घनी यांनी त्यांच्यावरील आरोप मात्र नाकारले आहेत. 8 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात, घनी म्हणाले की, ''मी आणि माझी पत्नी वैयक्तिक आर्थिक बाबतीत प्रामाणिक आहोत आणि आमची सर्व मालमत्ता सार्वजनिक केलेली आहे.''
अशरफ घनी मालमत्तांची चौकशी करण्यास तयार
अशरफ घनी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक वारसा देखील देण्यात आला असून तिचा मूळ देश असलेल्या लेबेनॉनमध्ये सूचीबद्ध केली गेलेली आहे. माझ्या विधानांची पडताळणी करण्यासाठी मी संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) किंवा इतर कोणत्याही योग्य स्वतंत्र संस्थेच्या तत्वाखाली अधिकृत ऑडिट किंवा आर्थिक तपासाचे स्वागत करतो, असे निवेदनात म्हटले आहे. माझे जवळचे सहकारी त्यांच्या मालमत्तांचे सार्वजनिक ऑडिट करण्यासाठी तयार आहेत. माजी राष्ट्रपती पुढे म्हणाले, मी इतर माजी वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनाही असे करण्यास प्रोत्साहित करीन आणि आग्रह करीन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.