Imran Khan: Change President of Afghanistan to control Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान्यांना रोखण्यासाठी अफगाणचे राष्ट्राध्यक्ष बदला, इम्रान खान यांची मागणी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी म्हटले आहे की जोपर्यंत अशरफ घनी (Ashraf Ghani) देशाचे अध्यक्ष राहतील तोपर्यंत दहशतवादी गट अफगाण (Afghanistan) सरकारशी चर्चा करणार नाही.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तान सैन्य (Afghanistan Army) आणि तालिबान (Taliban) यांच्यात मोठ्या प्रमाणात लढत असताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी म्हटले आहे की जोपर्यंत अशरफ घनी (Ashraf Ghani) देशाचे अध्यक्ष राहतील तोपर्यंत दहशतवादी गट अफगाण (Afghanistan) सरकारशी चर्चा करणार नाही. इस्लामाबादमध्ये (Islamabad) परदेशी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत राजकीय तोडगा काढणे कठीण दिसत आहे.(Imran Khan: Change President of Afghanistan to control Taliban)

'मी तीन ते चार महिन्यांपूर्वी तालिबानचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा तालिबानी येथे आले होते, पण तालिबान्यांनी एक अट ठेवली आहे की जोपर्यंत अश्रफ घनी आहेत तोपर्यंत आम्हीअफगाण सरकारशी चर्चा करणार नाही.'असे सांगत इम्रान खान यांनी आता नवीन वादाला तोंड फोडलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी पाकिस्तान तालिबानला मदत करतो असा काबुलचा विश्वास असल्याने या भागात अस्थिरता वाढवण्यासाठी अफगाणिस्तान सरकार पाकिस्तनवरच टीका करत आहे. अलीकडेच, अफगाणिस्तानच्या लोकांनी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे जी देशातील बिघडलेल्या परिस्थितीसाठी पाकिस्तानला दोष देत आहे.

त्याचबरोबर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी नवे लष्करप्रमुख नेमले आहेत. अफगाणिस्तानच्या अनेक प्रमुख भागात तालिबानचा कब्जा वाढत आहे. दरम्यान, बुधवारी, तालिबानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात राष्ट्रपती अशरफ घनी यांनी नवे लष्करप्रमुख नेमले आहेत . हैबतुल्लाह अलीझाई यांनी वाली मोहम्मद अहमदझाई यांच्या जागी नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.

तालिबानकडून देशात वाढत्या हिंसाचारामुळे, परिस्थिती वाईट होत चालली आहे कारण दहशतवादी गट लोकांना मोठ्या प्रमाणात लुटत आहेत त्याचबरोबर सरकारकडून अनेक क्षेत्रे ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांची हत्याही करत आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टन आणि तालिबान यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने मोठ्या संख्येने माघार घेण्यास सुरुवात केल्यावर तालिबानने अफगाण सैन्यावरील हल्ले तीव्र केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT