या बैठकीत अफगाणिस्तानातील वाढती हिंसा थांबवण्यासाठी आणि शांतता प्रक्रिया पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीत अफगाणिस्तानातील वाढती हिंसा थांबवण्यासाठी आणि शांतता प्रक्रिया पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात येणार आहे.Dainik Gomantak

Afghanistanमधील बिघडलेल्या परिस्थितीवर आज चर्चा, भारत करणार त्याचे नेतृत्व

कतारची राजधानी दोहा येथे अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर चर्चा होईल (The current situation in Afghanistan will be discussed in Doha, the capital of Qatar) आणि या चर्चेत भारतही सहभागी होईल. तसेच भारतच या बैठकीचे नेतृत्व करणार (India will lead the meeting) आहे.
Published on

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. तालिबानी (Taliban) हिंसाचाराच्या भीतीदायक घटना वेगवेगळ्या ठिकाणाहून समोर येत आहेत. दरम्यान, कतारची राजधानी दोहा येथे अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर चर्चा होईल (The current situation in Afghanistan will be discussed in Doha, the capital of Qatar) आणि या चर्चेत भारतही सहभागी होईल. तसेच भारतच या बैठकीचे नेतृत्व करणार (India will lead the meeting) आहे. या बैठकीत अफगाणिस्तानातील वाढती हिंसा थांबवण्यासाठी आणि शांतता प्रक्रिया पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीत अफगाणिस्तानातील वाढती हिंसा थांबवण्यासाठी आणि शांतता प्रक्रिया पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात येणार आहे.
Leave afghanistan: अफगाणिस्तान सोडा, मायदेशी परता! भारत सरकारचे आवाहन

वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या महितीनुसार, संघर्ष निवारणासाठी कतारचे विशेष दूत मुतलक बिन मजीद अल-कहतानी यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावेळी भारताला शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांचे दहशतवाद आणि संघर्ष निवारण मध्यस्थीचे विशेष दूत अल-कहतानी यांनी भारताला भेट दिली होती. या भेटीदरम्यान, त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला, परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण विभागाचे सहसचिव जे पी सिंह यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

या बैठकीत अफगाणिस्तानातील वाढती हिंसा थांबवण्यासाठी आणि शांतता प्रक्रिया पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात येणार आहे.
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात ४५ हून अधिक जण ठार

तुर्की आणि इंडोनेशिया देखील होणार सहभागी

दोहा प्रादेशिक परिषदेत भारताशिवाय तुर्की आणि इंडोनेशिया सहभागी होण्याची शक्यता आहे. कतारची राजधानी दोहा अफगाणिस्तान शांतता चर्चेचे ठिकाण आहे. हे आखाती देश अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रिया पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजाऊ शकतात, हे सिध्द झाले आहे.

भारताचा समेट प्रक्रियेला पाठिंबा

भारत अफगाणिस्तानमधील घडामोडींवर संबंधित पक्षांसह आणि महत्त्वाच्या शक्तींसह आपले प्रयत्न करीत आहे. भारत राष्ट्रीय शांतता आणि सलोखा प्रक्रियेला पाठिंबा देत आहे. भारताने अफगाणिस्तानच्या समृद्ध आणि सुरक्षित भवितव्यासाठी तेथील सर्व राजकीय घटक आणि देशातील सर्व लोकांना एकत्रीत काम करण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com