Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: 'जनरल बाजवा यांच्या कारस्थानामुळेच...', इम्रान खान यांचा घणाघात

Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा उघडपणे लष्करावर आरोप केले आहेत.

Manish Jadhav

Former Prime Minister Of Pakistan Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा उघडपणे लष्करावर आरोप केले आहेत. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यावर सरकार पाडल्याचा आरोप केला आहे.

माझे सरकार अमेरिकेने नाही तर बाजवा यांच्या कारस्थानामुळे पाडले, असे इम्रान खान म्हणाले. इम्रान म्हणाले की, कमर जावेद बाजवा यांनीच अमेरिकनांना इम्रान खान आपला विरोधक असल्याचे पटवून दिले होते.

याआधी, इम्रान खान (Imran Khan) यांनी अमेरिकेवर आपले सरकार पाडल्याचा आरोप केला होता. मात्र इम्रान यांनी पहिल्यांदाच असा यू-टर्न घेतला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला होता आणि त्यात बाजवा यांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉईस ऑफ अमेरिकाला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानमध्ये आज जे काही संकट आहे ते बाजवा यांच्यामुळेच आहे. ते पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानात (Pakistan) आज जे काही घडत आहे, त्यामागे बाजवा आहेत. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार बाजवा यांनी अमेरिकेला इम्रान खान आपला विरोधक असल्याचे सांगितले होते.'

इम्रान खान यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त झालेल्या कमर जावेद बाजवा यांना सुपर किंग म्हटले. इम्रान म्हणाले की, 'बाजवा हे सत्तेत सुपर किंगसारखे वागायचे.'

जबाबदारी असेल तर..

यासोबतच खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमध्ये निवडणुका घेण्याचीही मागणी इम्रान खान यांनी केली. ते म्हणाले की, 'देश राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या बदनाम आहे.' दुसरीकडे, सरकार आणि इम्रान खान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. शेवटी खान म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सरकार चालवण्याची पद्धत चुकीची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT