Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan यांना मोठा दिलासा, तोशाखाना प्रकरणात अजामीनपात्र वॉरंटवर स्थगिती

Pakistan: तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Manish Jadhav

Imran Khan: तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती दिली.

पीटीआय चेअरमन खटल्याच्या सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले होते. यापूर्वी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी या खटल्याची सुनावणी करताना निर्णय राखून ठेवला होता.

या आठवड्यात हे वॉरंट जारी करण्यात आले

गेल्या आठवड्यात याच न्यायालयाने इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. खरे तर, इम्रान यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या इतर तीन खटल्यांच्या सुनावणीला उपस्थित असताना कोर्टात हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता.

रविवारी, न्यायालयाचे समन्स मिळाल्यानंतर इस्लामाबाद पोलिसांचे (Police) पथक त्यांना अटक करण्यासाठी लाहोरला पोहोचले होते. मात्र, इम्रान घटनास्थळावर नसल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

त्यानंतर, इम्रान यांनी इस्लामाबाद सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी वॉरंट मागे घेतल्याने त्यांना या खटल्यात हजर राहण्याची आणि बाजू मांडण्याची योग्य संधी मिळेल, असा युक्तिवाद केला होता.

न्यायालयीन आदेश

पीटीआय प्रमुख इम्रान खान यांच्यावर मिळालेल्या भेटवस्तूंचा तपशील त्यांच्या मालमत्ता जाहीरनाम्यात लपवल्याचा आरोप आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, इम्रान यांनी त्यांच्याविरुद्धच्या अटक वॉरंटला कोणत्याही मंचावर आव्हान दिलेले नाही.

डॉन डॉट कॉमच्या वृत्तानुसार, एडीएसजे इक्बाल यांनी सांगितले की, आरोपींनी 28 फेब्रुवारीला कोर्टात हजर व्हायला हवे होते. मात्र ते जाणूनबुजून न्यायालयात हजर झाले नाहीत. इम्रान यांच्या खटल्यात हजर राहण्यासाठी हे वॉरंट जारी करण्यात आले होते, मात्र ते आजही न्यायालयात हजर झाले नाही, असे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maha Andolan: आझाद मैदानावर शेकडो नागरिक एकवटले! 39 A विरोधात महाआंदोलन; पोलिसांचा कडेकोट पहारा

Viral Video: 'विषयच हार्ड'! पठ्ठ्यांनी बनवली 6 चाकांची बाईक, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'हे टेक्निक देशाबाहेर जाता कामा नये!'

Arijit Singh Ek Din Song: 'अरिजीत सिंग इज बॅक'! नवीन गाणे घालते आहे धुमाकूळ; आमिर खानने भेटून केला चमत्कार Watch Video

Arambol Beach: "गोवा पूर्वी किती भारी होता"! हरमल बीचचे 1980 सालचे फोटो Social Media वर व्हायरल; पर्यटक झाले इमोशनल Watch Photos

Baba Vanga Predection: ट्रम्प यांचा 'तो' एक आदेश अन् बाबा वेंगाचं भाकित ठरणार खरं? लवकरच जगासमोर येणार 'सीक्रेट फाईल्स'

SCROLL FOR NEXT