Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेला IMF कडून आर्थिक दिलासा, 2.9 अरब डॉलरचे सशर्त पॅकेज लवकरच मिळणार

Sri Lanka Crisis: आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला लवकरच काहीसा दिलासा मिळू शकतो.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Crisis: आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला लवकरच काहीसा दिलासा मिळू शकतो. वृत्तानुसार, IMF च्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत श्रीलंकेने $2.9 अब्ज डॉलरच्या सशर्त आर्थिक पॅकेजला सहमती दर्शवली आहे. परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळे आयात थांबवण्यात आली आहे. श्रीलंकेत मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.

दरम्यान, श्रीलंकेवर (Sri Lanka) 51 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे. जुलैमध्ये संतप्त आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता. यानंतर माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांना देश सोडून पळून जावे लागले होते. सिंगापूरमधूनच (Singapore) त्यांनी आपला राष्ट्रपती राजीनामा पाठवला होता.

सुरुवातीला अडचणी येतील परंतु त्यावर मात करुन आपल्याला प्रगती करायची आहे. आपल्याला आता दृढ संकल्पावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटले. तर आयएमएफच्या (IMF) एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'श्रीलंकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.' आमचे शिष्टमंडळ श्रीलंकेसोबत आर्थिक सुधारणांबाबत चर्चा करेल, असे आयएमएफने यापूर्वी सांगितले होते.

प्रेस रिलीझनुसार, आयएमएफने म्हटले होते की, कर्जाची स्थिरता पुनर्संचयित केली जाईल याची हमी हवी आहे. श्रीलंकेने मे महिन्यातच IMF कडून मदत पॅकेजबद्दल बोलण्यास सुरुवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT