India Help To Sri Lanka: भारताने सोमवारी एका विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत 21,000 टनाहूंन अधिक खताचा पुरवठा श्रीलंकेला केला आहे. या पाऊलामुळे शेजारील देशातील शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. अलीकडच्या काही महिन्यांत भारताने संकटग्रस्त श्रीलंकेला दिलेली ही दुसरी मोठी मदत आहे.
भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करुन माहिती दिली
भारतीय उच्चायुक्तांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मैत्री आणि सहकार्याचे नाते पुढे नेले जात आहे. भारताच्या (India) विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत श्रीलंकेला (Sri Lanka) 21,000 टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.” मागील महिन्याच्या सुरुवातीला 44,000 टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. हा पुरवठा भारताने 2022 मध्ये $4 अब्जच्या एकूण मदतीअंतर्गत केला होता.
श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना मदत मिळेल
भारतीय उच्चायुक्तांनी पुढे म्हटले की, “खत पुरवठ्यामुळे अन्नसुरक्षा वाढेल आणि श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना (Farmers) मदत होईल. हे पाऊल भारतासोबतचे घनिष्ठ संबंध आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील परस्पर विश्वास आणि सद्भावना दर्शवते.” चालू कृषी हंगामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय टाळण्यासाठी भारताने मे महिन्यात श्रीलंकेला 65,000 टन युरियाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते.
श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट
श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. भारत आपल्या शेजारी देशाला सातत्याने मदत करत आहे. कधी इंधन, तर कधी जीवनावश्यक वस्तू... आता खतांचा पुरवठा करुन श्रीलंकन शेतकऱ्यांना मदत केली आहे. श्रीलंका सरकार वेळोवेळी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.