Idaho Air Show Jet Crash Dainik Gomantak
ग्लोबल

नजर चुकली अन् घात झाला! दोन विमानांची हवेतच समोरासमोर टक्कर; काळजाचा ठोका चुकवणारा भयंकर व्हिडिओ व्हायरल VIDEO

Idaho Air Show Jet Crash: अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली. एअर शो दरम्यान होणारे विमान अपघात आणि त्यात पायलटचे जाणारे जीव हे चिंता वाढवणारे असतात.

Manish Jadhav

Fighter Jet Collision Video Idaho: अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली. एअर शो दरम्यान होणारे विमान अपघात आणि त्यात पायलटचे जाणारे जीव हे चिंता वाढवणारे असतात. अनेकदा हवेत चित्तथरारक कृत्य दाखवण्याच्या नादात विमाने एकमेकांच्या इतकी जवळ येतात की, जमिनीवरुन हा खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांना कधीकधी अत्यंत भयानक दृश्य पाहावे लागते. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात नुकताच अमेरिकेतील आयडाहो राज्यात घडला.

येथील 'माउंटेन होम एअर फोर्स बेस' जवळ आयोजित करण्यात आलेल्या 'गनफाइटर स्काईज' या प्रसिद्ध एअर शो दरम्यान दोन लढाऊ विमानांची हवेतच एकमेकांशी जोरदार टक्कर झाली. या अपघातामध्ये (Accident) अमेरिकन नौदलाची 'EA-18G ग्राउलर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर' ही दोन अत्याधुनिक जेट विमाने हवेत एकमेकांना धडकली.

हा अपघात इतका भीषण होता की, एकमेकांना धडकल्यानंतर दोन्ही विमाने थेट जमिनीवर कोसळली. विमाने जमिनीवर आदळताच तिथे आगीचे मोठे लोळ उठले आणि संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड साम्राज्य पसरले. सुदैवाने, या मोठ्या दुर्घटनेत एक चमत्कार घडला आणि चारही पायलटचे प्राण वाचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेत विमानांची टक्कर झाल्यानंतर अत्यंत तत्परतेने दोन्ही जेट्समधील चारही पायलटनी पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून बाहेर उडी घेतली. 'आयडाहो स्टेट्समॅन'च्या अहवालानुसार, हे चारही अमेरिकन नौदलाचे पायलट सुखरुप आणि सुरक्षित आहेत.

एअर शोच्या उद्घोषकाने (अनाउन्सर) उपस्थित अथांग जनसमुदायाला 'चार सुरक्षित पॅराशूट' हवेत उघडल्याची माहिती दिली, ज्यानंतर प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हे पायलट अपघाताच्या ठिकाणापासून साधारण एक मैल अंतरावर सुरक्षित स्थितीत सापडले. या संपूर्ण थरारक आणि भयानक घटनेचा एक व्हिडिओ देखील आता समोर आला.

माउंटेन होम एअर फोर्स बेसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बेसच्या अगदी बाहेर झालेल्या या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून सध्या सखोल तपास सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक (इमर्जन्सी रिस्पॉन्डर्स) आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण एअर फोर्स बेस लॉकडाऊन करण्यात आला होता. विमाने पडल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आणि विमानांचा ढिगारा उपसण्यासाठी आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. तसेच, सुरक्षेची खात्री होईपर्यंत एअर शो पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांना बेस सोडण्याची परवानगी नाकारण्यात आली.

दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही जेट्स हवेत एकमेकांना घासताना आणि त्यानंतर लगेचच पायलटचे पॅराशूट उघडताना स्पष्ट दिसत आहेत. पॅराशूट उघडताच विमाने आगीच्या गोळ्यासारखी खाली कोसळताना पाहून अंगावर काटा येतो. स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळेत बचाव मोहीम राबवल्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आणि चार सैनिकांचे प्राण वाचले. नेहमीच रोमांचक ठरणारे हे एअर शो कधीकधी किती भयानक रुप घेऊ शकतात, याचेच हे जिवंत उदाहरण ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: LIVE सामन्यात राडा! मैदानावरच भिडले शाहीन आफ्रिदी अन् कोच उमर गुल; पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

US Navy Fighter Jets Crash: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! एअर शोदरम्यान दोन फायटर जेट्सची हवेतच टक्कर, अंगावर काटा आणणारा Video

Horoscope: सोमवारी बनला शिवयोग! 'या' 4 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस, महादेवांची लाभणार कृपा

Vegetable price hike: हवामान बदल आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका; भाजीपाल्याचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

SCROLL FOR NEXT