Iceland Volcano Dainik Gomantak
ग्लोबल

Iceland Volcano Video Viral: आइसलंडमध्ये ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Iceland Volcano Eruption: हा या भागातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Iceland Volcano eruption Video Viral

आइसलंड मध्ये भीषण ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. ज्वालामुखीचा भीषण स्फोट झाल्यानंतर देशाच्या दक्षिण भागात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हा ज्वालामुखीचा उद्रेक देशातील सर्वात मोठा स्फोट असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून यामध्ये लाव्हा वाहताना पाहायला मिळात आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ज्वालामुखीचा लाव्हा वाहत ग्रिंडाविक शहरापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ब्लू लगून आणि ग्रिंडाविक शहर रिकामे करण्यात आले आहे. डिसेंबरपासून या प्रदेशात ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची ही चौथी घटना आहे. याआधी 8 फेब्रुवारीलाही येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. आइसलँडचे हवाई क्षेत्र अद्याप खुले असून लाव्हामधून निघणारा धूर आकाशात पाहायला मिळत आहे.

आइसलंडच्या सिव्हील डिफेंस सर्व्हिसनुसार, शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता हा स्फोट ग्रिंडाविकच्या उत्तरेकडील होगाफेल आणि स्टोरा-स्कॉगाफेल दरम्यान झाला. याच ठिकाणी ८ फेब्रुवारीला स्फोट झाला होता. दरम्यान आता झालेल्या स्फोटाचे व्हिडीओ फुटेज समोर आले असून यामध्ये पृथ्वीच्या आतून धुराचे लोट आणि उकळणारा मॅग्मा बाहेर येताना दिसत आहे. आता या ज्वालामुखीचा व्हिडिओ व्हायरल होत असून थरकाप उडवाणारे दृश्य यामध्ये पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT